31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरदेश दुनियाफ्रान्स सरकारने ठोकले नऊ वादग्रस्त मशीदींना टाळे

फ्रान्स सरकारने ठोकले नऊ वादग्रस्त मशीदींना टाळे

मुस्लिम कट्टरतावाद्यांचा बंदोबस्त करण्याचा कार्यक्रम फ्रान्स सरकारने जारी ठेवला आहे. ताज्या घडामोडींमध्ये जिहादी इस्लामचा प्रचार प्रसार करणाऱ्या ९ मशिदींना टाळे ठोकण्याचा निर्णय फ्रान्सच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने अंमलात आणला आहे.

Google News Follow

Related

फ्रान्सने देशभरात मुस्लिम फुटीरतावादाच्या विरोधात चालवलेल्या मोहिमे अंतर्गत नऊ मशिदींना टाळे ठोकल्याची माहिती फ्रान्सचे अंतर्गत सुरक्षा मंत्री जेराल्ड डारमानिन यांनी दिली आहे.

हे ही वाचा: धार्मिक कट्टरतावादावर फ्रान्सचा पलटवार

“फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी आणि पंतप्रधानांनी दिलेल्या आज्ञेनुसार आम्ही इस्लामी फुटीरतावादाविरोधात निर्णायक पावले टाकत आहोत. आमची नजर असलेल्या १८ पैकी ९ मशिदींनी आम्ही बंद केले आहे.” असे ट्वीट फ्रान्सच्या मंत्र्यांनी केले आहे.

‘फिगारो’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार बंद करण्यात आलेल्या संस्थांपैकी तीन सैन-सेंट-डेनिस या पॅरिस नजीकच्या विभागात स्थित आहेत.

सॅम्युएल पॅटी या इतिहास शिक्षकाच्या निघृण हत्येनंतर फ्रान्स सरकारने मुस्लिम कट्टरतावादाच्या विरोधातील आपली मोहिम तीव्र केली. सॅम्युएल पॅटी यांनी वर्गात चार्ली हेब्दो या नियतकालीकात प्रसिद्ध झालेले प्रेषित महंमदाचे व्यंगचित्र दाखवल्याने त्यांची शिरच्छेद करून हत्या करण्यात आली होती. हेच व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याने २०१५ मध्ये नियतकालीकाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर २०२० मध्ये देखील पुन्हा एकदा चार्ली हेब्दोच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता.

गेल्या काही काळात फ्रान्समध्ये मध्यपूर्वेतून मोठ्या प्रमाणात मुस्लिम निर्वासित स्थायिक झाले आहेत. मागील काही वर्षे फ्रान्स मुस्लिम कट्टरतावादाचे हल्ले अनुभवत आहे. सॅम्युएल पॅटी या शिक्षकाच्या हत्येने फ्रान्सच्या सहनशीलतेची परिसीमा पाहिली असून, फ्रान्स सरकारने आता मुस्लिम कट्टरतावादावर कडक प्रहार करण्यास सुरूवात केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा