30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरदेश दुनियातुर्कीचा गोलरक्षक तुर्कस्लान भूकंपात मृत्युमुखी

तुर्कीचा गोलरक्षक तुर्कस्लान भूकंपात मृत्युमुखी

पत्नी सुखरूप

Google News Follow

Related

सहा फेब्रुवारीला नुकताच तुर्की आणि आजूबाजूच्या देशात विनाशकारी भूकंप झाला त्यात मृतांचा आकडा वाढत आहेत त्यातच आता तुर्कीचा प्रसिद्ध गोलकीपर अहमत इयूप तुर्कस्लान याचा सात फेब्रुवारीला मृत्यू झाल्याचे आता स्पष्ट होत आहे. अहमत इयूप तुर्कस्लान हा मालत्या स्पोर या क्लब कडून खेळत होता.

तुर्कीमध्ये भूकंपामुळे झालेला विध्वंसाचे चित्र संपूर्ण देशासमोर आहे. आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणांत वित्त आणि जीवित हानी झाली आहे. मृतांचा आकडा रोज वाढतच आहे, हजारो लोक बेघर झाले आहेत. कितीतरी लोके अजून बेपत्ता असून त्यांची काहीच माहिती मिळत नाही आहे. याच विनाशकारी भूकंपात तुर्की देशाने आपला गोलकीपर २८ वर्षीय गोलरक्षक ‘अहमत इयूप तुर्कस्लान ‘ जो मालट्यास्पोर या क्लब कडून खेळत होता. या क्लब बरोबर त्याचा एक वर्षाचा करार सुद्धा झाला होता पण त्याच्यावर  काळाने झडप घातली.

अहमत इयूप तुर्कस्लान ची कारकीर्द

अहमत इयूप तुर्कस्लान याची कारकीर्द एकूण दहा वर्षांची होती. यादरम्यान त्याने पाच क्लब साठी ८७ सामने खेळले. आणखी बरेच यशस्वी सामने त्याला खेळायचे होते त्याचे जाणे हे खूप दुःखद आहे. दरम्यान आपल्या गोलकीपरचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या क्लब मध्ये भयानक शांतता पसरली आहे. अहमत शिवाय ख्रिश्चन अष्टु हा आणखीही एक खेळाडू या भूकंपामुळे बेपत्ता असल्याची बातमी आली होती. पण आता तो सापडल्याची बातमी आली आहे. शिवाय या भूकंपात तो सुखरूप असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा:

अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप

श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात

पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद

आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला

अहमतच्या मृत्यूमुळे त्याच्या सगळ्याच क्लब मध्ये शांतता पसरली आहे. त्याला श्रद्धांजली वाहताना अहमत ‘आम्ही तुला विसरूच शकत नाही’ असे म्हंटले आहे. त्याच्या पश्चात त्याची पत्नी कुब्रा तुर्कस्लान आहे. ती या ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर आल्याचे तिने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. अहमत तुर्कस्लानने आपली संपूर्ण वरिष्ठ कारकीर्द तुर्की क्लब मध्ये व्यतीत केली होती. ज्यामध्ये बगसा स्पोर , ओस्मान लि स्पोर , उमरा निये स्पॉरे, आणि येनी मालत्या स्पोर यांचा समावेश आहे. मानवतावादी संकटांच्या  पार्श्वभूमीवर तुर्कीमधील सर्व व्यावसायिक फुटबॉल सामने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा