28 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरराजकारणश्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात

श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात

९८ वर्षीय राम सुतार बनवणार मूर्ती

Google News Follow

Related

अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मंदिराचे बांधकाम करण्यासाठी नुकत्याच नेपाळहून आलेल्या दोन शाळीग्राम शिळा अयोध्येमध्ये दाखल झाल्या आहेत. यासाठी या मूर्तींना सर्वांच्या परिचयाचे मराठमोळ्या शिल्पकाराचे हात या मूर्ती ना आकार देणार आहेत. उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीत सध्या राममंदिराचे काम जोरात सुरु आहे. मंदिर नेमके कसे असेल या बद्दल सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. नेपाळच्या गंडकी नदीतील सहा कोटी वर्ष जुन्या दोन शाळीग्राम शिळा अयोध्येत पोचल्या आहेत. या दोन शिळेतून श्रीराम आणि सीतामाई अशा दोन मुर्त्या बनणार आहेत.

या दोन शिळांना मूर्त रूप देऊन श्रीराम आणि सीतामाता यांना साकारण्याची जबाबदारी मराठमोळे शिल्पकार राम सुतार यांच्यावर देण्यात आली आहे. यापूर्वी सुतार यांनी छत्रपती शिवाजी महाराज , शंकर भगवान , डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल अशा एकाहून एक सर्रास मूर्त्या साकारल्या आहेत. त्यांनी बनवलेला सरदार पटेल हा पुतळा जगातील सर्वांत मोठा पुतळा आहे. जो ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील गोंदूर या गावचे राम सुतार हे असून त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९२५ सालचा आहे.

मुंबईतल्या जेजे स्कूल ऑफ आर्ट मधून त्यांनी आपले शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी दिल्ली मध्ये भारत सरकारच्या माहिती प्रसारण विभागात काम केले.आहे. १९९० साली दिल्लीतील नोएडामध्ये ते राहायला लागले आणि तिथेच स्थायिक झाले. काही काळ त्यांनी मुक्त मूर्तिकार म्हणूनही काम केले आहे. सुतार यांच्यावर महात्मा गांधींजीचा प्रभाव होता. १९५४ ते १९५८ मध्ये त्यांनी अजिंठा , वेरूळ च्या संवर्धनात सुद्धा काम केले. चंबळ स्मारकाची मूर्ती त्यांनी फक्त एका दगडातून साकारली आहे. तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना भाक्रा नांगल धरणाची निर्मिती करणाऱ्या मजुरांच्या सन्मानार्थ ५० फूट उंची असलेला कामगारांचा पुतळा उभारण्याचे काम देण्यात आले होते.

हे ही वाचा:

पी. चिदंबरम यांच्या पत्नीची संपत्ती ईडीकडून जप्त

मध्य रेल्वे मार्गावर रविवार ५ फेब्रुवारीला मेगा ब्लॉक, जाणून घ्या वेळ…

अजितदादांच्या मते उद्धव ठाकरेंमुळे सरकार कोसळलं?

सॅमसंगचे आता भारतातच ‘स्मार्ट’ उत्पादन

याशिवाय गोविंद वल्लभ पंत यांचे कास्य शिल्प, अमृतसर मधील महाराजा रणजित सिंग , संसदेतील महात्मा गांधी यांची मूर्ती राम सुतार यांनी बनवली आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात महात्मा गांधी यांचा पुतळा बसवण्यात आला आहे तो सुद्धा रा म सुतार यांनी बनवला आहे. अयोध्येतील वीणा शिल्प जे महान गायिका लता मंगेशकर यांना समर्पित करण्यात आले आहे. ते सुद्धा सुतार यांनीच साकारले आहे.

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांची २१२ मीटर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३७. २ मीटर पुतळा याची जबाबदारी रा म सुतार यांच्याकडे आहे. कर्नाटकातील शंकर भगवान यांची ४६. ६ मीटरची मूर्ती देखील आता सुतारच बनवत आहेत. आणि नुकत्याच अयोध्येत दाखल झालेल्या दोन शिळा ज्यातून श्रीराम आणि सीतामाई यांच्या मुर्त्यांही राम सुतारच बनवणार आहेत. अयोध्येत श्री रामाचा सर्वात भव्य आणि उंच पुतळा राम सुतार आपल्या मुलाच्या सहकार्याने साकारणार आहेत.  भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी १९९९ मध्ये पंतप्रधान असताना त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर, साहित्य कला परिषद नवी दिल्ली यांच्याकडून तसेच बॉम्बे आर्टस् सोसायटीकडून त्यांना एकूण तीन पुरस्कार मिळाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,877चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा