30 C
Mumbai
Friday, August 21, 2026
घरदेश दुनियाहोर्मुझमधून तेल नेण्यासाठी अमेरिकेने उघडला ‘गुप्त मार्ग’?

होर्मुझमधून तेल नेण्यासाठी अमेरिकेने उघडला ‘गुप्त मार्ग’?

दररोज १५ ते २० जहाजे प्रवास करत असल्याची माहिती

Google News Follow

Related

इराणसोबतच्या युद्धाला जवळपास सहा महिने होत असताना संघर्षावर अद्याप तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलवाहतूक सुरू ठेवण्यासाठी गुप्त शिपिंग कॉरिडॉर तयार केल्याची माहिती समोर आली आहे. ‘अॅक्सिओस’च्या वृत्ताचा हवाला देत ‘इंडिया टुडे’ने याबाबत माहिती दिली आहे.

अमेरिकी लष्कराच्या देखरेखीखाली ही मोहीम गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असल्याचे सांगितले जाते. या गुप्त मार्गातून दररोज रात्री सुमारे १५ ते २० तेलवाहू जहाजे होर्मुझची सामुद्रधुनी पार करत आहेत. ही जहाजे ओमानच्या किनाऱ्याजवळील दक्षिणेकडील मार्गाचा वापर करत असल्याचे वृत्त आहे. या माध्यमातून दररोज लाखो बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक केली जात आहे.

अमेरिकी लष्कर या ऑपरेशनमध्ये रिकाम्या तेलवाहू जहाजांना अरबी समुद्रातून आखातात प्रवेश करण्यासाठी मदत करत आहे. आखाती देशांकडून तेल भरल्यानंतर ही जहाजे सुरक्षितपणे होर्मुझमधून बाहेर पडतील, याचीही देखरेख केली जात आहे. अमेरिकी लष्कराच्या मध्यवर्ती कमांडच्या अलीकडील कारवाईमुळे इराणची रडार आणि सागरी देखरेख क्षमता कमकुवत झाल्याने या मार्गाचा वापर तुलनेने सुरक्षित झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

इराण-अमेरिका संघर्षामुळे होर्मुझमधून होणारी तेलवाहतूक मोठ्या प्रमाणात घटली आहे. या सामुद्रधुनीतून जगातील समुद्री मार्गाने होणाऱ्या तेलपुरवठ्याचा सुमारे एक चतुर्थांश हिस्सा जातो. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाल्यास जागतिक तेलाच्या किमतीवर मोठा परिणाम होऊ शकतो. अलीकडेच होर्मुझमधील वाहतूक पुन्हा मंदावल्याने तेलबाजारात अस्थिरता वाढली आहे.

हे ही वाचा:

पाकला ‘जशास तसं’ दणका; उच्चायोगाबाहेरील बॅरिकेड्स हटवले

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ‘आयपीओ’ला सेबीचा ग्रीन सिग्नल!

सकाळी १० वाजले तरी ऑफिस रिकामं! बंगळुरूच्या ट्रॅफिकला कंपन्या हैराण

जेन झीला आकर्षित करण्यासाठी सरकारी बँकांनी ‘कूल’ व्हावे

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. त्यांनी इराणसोबतच्या ६० दिवसांच्या युद्धविरामाला मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. तसेच, होर्मुझची सामुद्रधुनी खुली असल्याचा दावा करत अमेरिकेचे या महत्त्वाच्या जलमार्गावर नियंत्रण असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष संपण्याची चिन्हे अद्याप स्पष्ट दिसत नाहीत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा