29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरक्राईमनामासचिन वाझेच्या रक्तवाहिनीत सापडले तीन मोठे ब्लॉक

सचिन वाझेच्या रक्तवाहिनीत सापडले तीन मोठे ब्लॉक

Google News Follow

Related

खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी विशेष न्यायालयाच्या परवानगी नंतर सचिन वाझे याला भिवंडीच्या एका खाजगी रुग्णालयात मंगळवारी दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयात सचिन वाझे याच्यावर हृदयावर शस्त्रक्रिया होणार आहे. स्थानिक पोलिसाकडून या रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सचिन वाझे याने स्वतःहून भिवंडीतील या रुग्णालयाचे नाव सुचवले असून त्या मागे काय कारण असू शकते याबाबत काहीही कळू शकले नाही.

अँटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकणातील मुख्य आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हा तळोजा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. सचिन वाझे याच्या छातीत दुखू लागल्यामुळे मागील १५ ते २० दिवसापासून त्याच्यावर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरू होते. सचिन वाझे याच्या रक्तवाहिनीत ३ मोठे ब्लॉक असल्यामुळे त्याला शस्त्रक्रियेची गरज असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले होते.

हे ही वाचा:

रेल्वेच्या डब्यांना आता यांत्रिक ‘आंघोळ’…वाचा!

अशी झाली पहिली भारत तालिबान भेट…

विमानप्रवासावरून राज्यपाल कोश्यारी पुन्हा चर्चेत…काय घडले?

खासगी क्लासचालकांचे इंटिग्रेटेड उद्योग

दरम्यान, सचिन वाझेवर ओपन हार्ट सर्जरी करण्यात येणार आहे, मात्र ही शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात करण्यात यावी यासाठी सचिन वाझेने विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून परवानगी मागितली होती. दरम्यान, या अर्जावर सोमवारी न्यायालयात सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वाझेला याबाबत आपले मत विचारले असता त्याने केवळ ‘माझा फादर स्टेन स्वामी होऊ नये ही इच्छा आहे’ एवढेच न्यायालयत म्हटले होते. त्याच्या या बोलण्याने न्यायालयातील वातावरण काही वेळासाठी गंभीर झाले होते. त्यानंतर न्यायालयाने त्याला खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली, मात्र ही शस्त्रक्रिया स्वखर्चाने करावी असे न्यायालायने म्हटले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा