33 C
Mumbai
Wednesday, May 18, 2022
घरक्राईमनामालग्न करून धर्मांतराला नकार दिला म्हणून हिंदू तरुणीची हत्या

लग्न करून धर्मांतराला नकार दिला म्हणून हिंदू तरुणीची हत्या

Related

पाकिस्तान मधील हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबायचे नाव घेत नाही आहेत. अशाच एका ताज्या घटनेत पाकिस्तान मधील सिंध प्रांतात राहणार्‍या एका हिंदू तरुणीची हत्या करण्यात आली आहे. एका मुस्लिम युवकाचा लग्नाचा प्रस्ताव फेटाळला म्हणून तिचा खून करण्यात आला आहे. पूजा कुमारी असे या मृत तरुणीचे नाव आहे.

वाहिद बक्स लशरी असे आरोपीचे नाव असून त्याचा १८ वर्षीय पूजा कुमारी या तरुणीवर डोळा होता. पूजाशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती. पण हे फक्त लग्नापर्यंत मर्यादित नसून त्याला तिचे धर्मांतर घडवून आणायचे होते. पूजाने लग्न करून इस्लाम स्वीकारावा अशी त्याची इच्छा होती. याने पूजाशी याबाबत विचारणाही केली पण पूजाने त्याला साफ नकार दिला होता.

हे ही वाचा:

सुजित पाटकर व इतरांविरुद्ध सोमय्यांची एस्प्लनेड न्यायालयात याचिका

ठाणे महापालिका आयुक्त शिवबंधनात?

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातून होणार आणखी ‘फाइल’ उघड

मल्ल्या, नीरव मोदी आणि चोक्सी यांची १९,००० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

पण पूजाचा नकार तो पचवू शकला नाही. हा नकार त्याला त्याचा अपमान वाटला आणि त्याच्यातला धार्मिक कट्टरतावादी जागा झाला. त्याने पूजाला पळवून नेण्याचा आणि जबरदस्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तो सुकुर जिल्ह्यातील घोटकी शहरात असलेल्या पूजा कुमारी हिच्या घरात घुसला. त्याने पूजाला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पण पूजाने त्याचा तीव्र विरोध केला. प्रतिकार करून स्वतःची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत होती. यात तिला यशही येताना दिसत होते. पण अशातच लशरी यांनी तिच्या वर गोळ्या झाडल्या आणि तिला मरण्यासाठी घरात सोडून तो निघून गेला.

पूजाच्या घरच्यांना आणि नातेवाईकांना या गोष्टीची माहिती मिळताच त्यांनी या विषयात न्याय मागायला सुरुवात केली. त्यांनी यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपीला अटक केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,976चाहतेआवड दर्शवा
1,883अनुयायीअनुकरण करा
9,330सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा