अमेरिकेवर शटडाऊनचं संकट ओढावलं असून यामुळे फेडरल सरकार ठप्प झाले आहे. ट्रम्प सरकारला संसदेत निधीला मंजुरी न मिळाल्यानं टाळं लावण्याची वेळ आली आहे. दरम्यान, अमेरिकन सरकारचे शटडाऊन सुरूच असल्याने, त्याचा परिणाम आता देशभरातील विमानतळांवरील हवाई वाहतूक नियंत्रणापर्यंत पोहोचला आहे. लॉस एंजेलिसच्या हॉलीवूड बर्बांक विमानतळावर वाहतूक नियंत्रक नसल्याची घटना घडली. याचे कारण म्हणजे शटडाऊनमुळे कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाली आहे.
फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या सूचनेनुसार, कर्मचाऱ्यांची कमतरता स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ४:१४ वाजल्यापासून सुरू होऊन रात्री १० वाजेपर्यंत राहणार होती. या काळात बर्बांक विमानतळाचा एटीसी टॉवर मानव रहित ठेवण्यात आला होता. हवाई वाहतूक नियंत्रकांनी सांगितले की, विमानतळावरून विमान उतरवताना आणि उड्डाण करताना वैमानिकांशी संवाद साधण्याची जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात सॅन दिएगो येथील दक्षिण कॅलिफोर्निया येथे हस्तांतरित करण्यात आल्या होत्या.
कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेला आणि शटडाऊनसाठी ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र डागले. त्यांनी म्हटले की, धन्यवाद, ट्रम्प तुमच्या सरकारच्या बंदमुळे दुपारी ४:१५ ते रात्री १० वाजेपर्यंत बर्बांक विमानतळावर शून्य हवाई वाहतूक नियंत्रक आहेत.
म्प सरकारला संसदेत निधीला मंजुरी न मिळाल्यानं टाळं लावण्याची वेळ आली आहे. सहा वर्षांत पहिल्यांदाच अमेरिका पुन्हा एकदा बंद पडली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला अमेरिकन संसदेच्या वरिष्ठ सभागृह सिनेटमध्ये तात्पुरते निधी विधेयक मंजूर करण्यात अपयश आले. यासाठी त्यांना ६० मतांची आवश्यकता होती, परंतु सरकारला फक्त ५५ मते मिळाली. त्यामुळे सरकार कोणतेही पैसे खर्च करू शकणार नाही.
हे ही वाचा :
गुजरातमधील द्वारका शहरात पॅलेस्टाइनचा झेंडा फडकावणाऱ्याला अटक
बलुचमध्ये जाफर एक्सप्रेसवर पुन्हा हल्ला; आयईडी स्फोटानंतर सहा डबे घसरले
केस कापणाऱ्या जावेद हबीबने अनेकांचे खिसे कापले, २० गुन्हे दाखल
सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा वकील म्हणाला- ”कोणताही पश्चाताप नाही”
अमेरिकन सरकार चालवण्यासाठी, संसदेने दरवर्षी बजेट किंवा निधी विधेयक मंजूर करणे आवश्यक आहे. जर कोणत्याही कारणास्तव, हे विधेयक अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले नाही, तर सरकारी कार्यालये काम करणे बंद करतात, कारण कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार मिळू शकत नाहीत. शिवाय, इतर खर्च देखील थांबतात, ज्यामुळे काम थांबते. या परिस्थितीला शटडाऊन म्हणून ओळखले जाते. गेल्या दोन दशकांत अमेरिकेतील हे पाचवे मोठे शटडाऊन आहे, असे मानले जाते.







