28 C
Mumbai
Monday, April 6, 2026
घरदेश दुनिया“कराराची मंगळवारची मुदत चुकल्यास सर्व उध्वस्त करणार!”

“कराराची मंगळवारची मुदत चुकल्यास सर्व उध्वस्त करणार!”

इराणला ट्रम्प यांचा इशारा

Google News Follow

Related

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका- इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर एक इशारा दिला आहे. यामुळे खळबळ उडाली असून या संघर्षाला अधिक हिंसक वळण येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. इराणने करार करण्यास नकार दिला तर सर्व उध्वस्त करणार असा गंभीर इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्कीच्या माध्यमातून अप्रत्यक्ष चर्चा सुरू असतानाच हा धोका निर्माण झाला आहे. युद्धविराम आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे ही या चर्चेची उद्दिष्ट्ये आहेत.

मंगळवारच्या अंतिम मुदतीपूर्वी, ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी इशारा दिला की, सामुद्रधुनी उघडा, नाहीतर तुम्ही नरकात राहाल, असे त्यांनी ‘ट्रुथ सोशल’वर लिहिले. निरपराध नागरिकांबद्दल विचारले असता, ट्रम्प म्हणाले की, त्यांना विश्वास आहे की जे लोक आपल्या सरकारच्या भीतीखाली जगत आहेत, ते राजवटीला हादरवून टाकणाऱ्या अशा उपायांना पाठिंबा देतील.

इराण संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या आदेशांचे पालन करत असल्याचा आरोप केला. गालिबाफ यांनी इराणी नागरिकांचा आदर करण्याचे आणि त्यांनी “धोकादायक खेळ” असे संबोधलेल्या गोष्टीला थांबवण्याचे आवाहन केले.

हे ही वाचा:

इसिस संघटनेशी संबंधित दोन संशयिताना ठाणे, कुर्ल्यातून अटक

कर्णधार दमदार; लखनऊ सुपर जायंट्सचा हैदराबादवर मोठा विजय

जेवणानंतर गोड खाण्याची सवय का लागते? शरीर देतंय महत्त्वाचा इशारा

हॉर्मुझ संकटातही भारत निर्धास्त; सरकारचा ‘थार प्लॅन’ ठरतोय प्रभावी

दरम्यान, थेट चर्चा पाच दिवस लांबल्याने त्यांनी निराशा व्यक्त केली; याच विलंबामुळे त्यांनी तेहरानमधील पुलावर हल्ला केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्कीचे परराष्ट्र मंत्री विश्वास वाढवणारे उपाय तयार करण्यासाठी धडपडत आहेत, जेणेकरून मुदतवाढ मिळू शकेल आणि दोन्ही बाजू वाटाघाटीच्या टेबलाजवळ येऊ शकतील. आतापर्यंत यात कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा