32 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
घरदेश दुनियालसीकरणावरून भारताला शिकवणीची गरज नाही- फ्रेंच राष्ट्राध्यक्ष

लसीकरणावरून भारताला शिकवणीची गरज नाही- फ्रेंच राष्ट्राध्यक्ष

Google News Follow

Related

भारतात कोरोना विषाणूनं थैमान घातलं असून या संसर्गानं अतिशय भयावह वळण घेतलेलं असतानाच, फ्रान्स या मित्रराष्ट्रानं मात्र देशातील परिस्थिती सुधारेल अशी आशा व्यक्त करत देशाच्या नेतृत्त्वाला दिलासा दिला आहे. भारत-इयू वर्चुअल समिटमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅकरोन यांनी जवळपास २६ आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धीर वाढवणारं वक्तव्य केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताला लसीकरणाच्या मुद्द्यावरून कोणाच्याही शिकवणुकीची गरज नाही, असं ते स्पष्ट म्हणाले.

कोरोना परिस्थिती हाताळण्यात देशातील नेतृत्त्व आणि सरकार अपयशी ठरल्याच्या मुद्द्यावरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकांनीच भारताविषयी नाराजीचा सूर आळवला. लसीकरण मोहिमेत येणाऱ्या अडचणींमुळंही अनेकांनीच तीव्र निराशा व्यक्त केली. पण, इतर कोणाकडूनही भारताला काहीही शिकवलं जाण्याची गरज नसल्याचं म्हणत फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी देशातून इतर राष्ट्रांना दिलेल्या लसींच्या मदतीची आठवण करुन दिली.

‘लसींच्या पुरवठ्याच्या बाबतीत भारताला कोणीही काही शिकवणुकीचे धडे ऐकवण्याची गरज नाही. भारताकडून (लसींच्या रुपात) इतर राष्ट्रांना मानवतेच्या नात्यानं मदत करण्यात आली. सध्या हा देश कोणत्या परिस्थितीचा सामना करत आहे, हे आपण सर्वजण जाणतो’, असं ते म्हणाले. दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या या परिषदेला जर्मनीच्या अँजेला मार्केल यांच्यासह इतरही दिग्गज प्रतिनिधींची उपस्थिती होती.

हे ही वाचा:

‘या’ कंपनीत मिळणार २८ हजार तरुणांना नोकऱ्या

चीनचे रॉकेट मालदीवजवळ कोसळले

स्वतःच्या मुलाला मंत्री केलंत, तसंच आता बहुजनांच्या मुलांच्या नियुक्त्या करा

सावरकर म्हणाले, हा प्रश्न म्हणजे दुसऱ्या बाजीरावानंतर कोण या प्रश्नासारखा वाटतो!

विकसित देशांकडून इतर राष्ट्रांच्या वाटेनं जाणाऱ्या लसींच्या पुरवठ्यात अडथळे आणले गेल्याचं म्हणजत या देशांनी इतर देशांना लस देण्यासाठी प्राधान्य देणं अपेक्षित होतं, हा मुद्दा त्यांनी उचलून धरला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा