प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) दीर्घकाळ चाललेल्या लष्करी तणावानंतर भारत आणि चीन या दोन्ही देशांनी विविध पातळ्यांवर त्यांचे संबंध सामान्य करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता जगभरातील भारतीय मिशन आणि वाणिज्य दूतावासांद्वारे अर्ज करणाऱ्या चिनी नागरिकांसाठी भारताने पर्यटक व्हिसा खुले केले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला जगभरातील भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमध्ये चिनी नागरिकांसाठी पर्यटक व्हिसा उघडण्यात आले.
जुलैमध्ये भारताने चिनी नागरिकांसाठी पर्यटक व्हिसा पुन्हा सुरू केल्यानंतर चार महिन्यांनी हे पाऊल उचलण्यात आले आहे. एप्रिल- मे २०२० मध्ये एलएसीवर झालेल्या चकमकीनंतर चिनी नागरिकांचे व्हिसा निलंबित करण्यात आले होते. गलवान खोऱ्यात झालेल्या लष्करी संघर्ष आणि क्रूर चकमकीमुळे द्विपक्षीय संबंध सहा दशकांतील सर्वात तणावपूर्ण पातळीवर गेले. त्यानंतर या आठवड्याच्या सुरुवातीला जगभरातील भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमध्ये चिनी नागरिकांसाठी पर्यटक व्हिसा उघडण्यात आले होते. या हालचालीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि चीन यांनी अलिकडच्या काही महिन्यांत संबंध स्थिर करण्यासाठी आणि पुनर्बांधणीसाठी अनेक “लोक-केंद्रित पावले” उचलली आहेत. २०२० च्या सुरुवातीपासून बंद असलेल्या दोन्ही बाजूंची थेट उड्डाणे ऑक्टोबरमध्ये पुन्हा सुरू करण्यात आली. संबंध सामान्य करण्यासाठी इतर पावले उचलण्यात उन्हाळ्यात तिबेट प्रदेशातील पवित्र स्थळांना कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा करार, विविध श्रेणीतील प्रवाशांसाठी व्हिसा सुविधा आणि राजनैतिक संबंधांच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे स्मरण यांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
भारतीय बनावटीचं तेजस दुबईच्या एअर-शोमध्ये कोसळले
स्फोटकांमधील रसायने तयार करण्यासाठी डॉ. मुझम्मिलकडून पिठाच्या गिरणीचा वापर
स्फोटकांमधील रसायने तयार करण्यासाठी डॉ. मुझम्मिलकडून पिठाच्या गिरणीचा वापर
देशभरातील घुसखोरांना शोधून हाकलणार!
यापूर्वी, भारताने जुलैमध्ये चिनी नागरिकांना बीजिंगमधील भारतीय दूतावास आणि शांघाय, ग्वांगझू आणि हाँगकाँगमधील वाणिज्य दूतावासात अर्ज करण्याची सुविधा देऊन पर्यटक व्हिसा पुन्हा सुरू केला होता. राजनैतिक संबंधांच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही बाजूंच्या दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले.







