33 C
Mumbai
Saturday, March 14, 2026
घरस्पोर्ट्सक्रिकेटचा कालावधी छोटा; म्हणून शिक्षणावरही लक्ष द्या!

क्रिकेटचा कालावधी छोटा; म्हणून शिक्षणावरही लक्ष द्या!

दिलीप वेंगसरकरांनी केले मुलांना आवाहन

Google News Follow

Related

“क्रिकेट बरोबरच शिक्षणही तेवढेच महत्वाचे आहे. सध्या शालेय परीक्षांचा कालावधी सुरु आहे, त्यामुळे काही काळ क्रिकेटला थोडा विराम देऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करून परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होण्यावर लक्ष केंद्रित करा. शेवटी आयुष्यात क्रिकेट खेळण्याचा कालावधी हा फार छोटा असतो आणि शिक्षणात तुम्ही योग्य ती प्रगती साधलीत तर यशोशिखरावर जाण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही”, असे भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी सांगितले.

१५ वर्षाखालील मुलांच्या एच.डी.एफ.सी. बँक परिवर्तन कप क्रिकेट स्पर्धेच्या ओव्हल मैदान येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. साईश क्रिकेट अकादमी संघाने पटेल क्रिकेट कोचिंग सेन्टर वर दोन विकेट्सनी विजय मिळवून या स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरेंची पवारांच्या नावावर फुली

… म्हणून सिंगल- सीट तेजस विमानांचा संपूर्ण ताफा ग्राउंड!

पहाटेची प्रेरणा, शिस्तीची ताकद आणि सकारात्मकतेची साथ

Gen Z मुळे मद्य उद्योगाला ८३० अब्ज डॉलरचा फटका

साईश क्रिकेट अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या पटेल क्रिकेट कोचिंग सेन्टर संघाला ३३ षटकांत केवळ ११० धावांत गुंडाळण्याची करामत केली. अद्वैत तिवारीची ‘हॅट ट्रिक’ आणि प्रज्ञान भोसलेंचे २८ धावांत ४ बळी यामुळे त्यांनी ही करामत केली. या आव्हानाचा पाठलाग करताना साईश क्रिकेट अकादमी संघाची देखील दमछाक झाली. ४८ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतर अद्वैत तिवारी (२४) आणि अथर्व फेगडे (नाबाद ४३) यांनी पाचव्या विकेटसाठी ४० धावांची भागी रचून संघाचा डाव सावरला. ५ बाद ८८ वरून त्यांनी १०६ धावांत ८ विकेट्स गमावल्या होत्या. पटेल सी.सी.संघाच्या शिव त्रिपाठी याने सलग दोन चेंडूवर विकेट्स मिळवत त्यांना ८ बाद १०६ असे अडचणीत आणले होते. मात्र फेगडेने नाबाद ४३ धावा करत संघाचा विजय साकारला.

अंतिम फेरीतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून अद्वैत तिवारी याची निवड करण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम फलंदाज म्हणून शिव सेवा क्रिकेट अकादमीच्या रोहित पुजारी (२५४ धावा) याला गौरविण्यात आले. सर्वोत्तम गोलंदाज म्हणून दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी (ओव्हल) संघाच्या आरुष पोंडले (९ बळी) याला तर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून पटेल सी.सी.च्या कबीर जगताप (८ झेल) यांना गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, एच.डी.एफ.सी. बँकेच्या रायगड झोनचे प्रमुख कार्तिक अंजारिया, दक्षिण मुंबईचे क्लस्टर हेड नंजय भाटिया आणि स्टेट प्रोजेक्ट मॅनेजर विनीत जाधव आणि मुंबईच्या १६ वर्षाखालील मुलांच्या निवड समितीचे जयप्रकाश जाधव आणि अमोल भालेकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेत १८ संघांचा सहभाग लाभला होता आणि ओव्हल तसेच माहुल येथील वेंगसरकर अकादमीच्या मैदानावर या स्पर्धेतील सामने खेळविण्यात आले होते.

संक्षिप्त धावफलक : पटेल क्रिकेट कोचिंग सेन्टर – ३३ षटकांत सर्वबाद ११० (अक्षय नायर १६, धीर काढी १७; प्रज्ञान भोसले २८ धावांत ४ बळी, अद्वैत तिवारी २० धावांत ३ बळी) पराभूत वि. साईश क्रिकेट अकादमी – २८.१ षटकांत ८ बाद ११३ (विकास सराफ २३, अद्वैत तिवारी २४, अथर्व फेगडे नाबाद ४३ ; शिव त्रिपाठी ३७ धावांत ३ बळी) सामनावीर – अद्वैत तिवारी.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा