31 C
Mumbai
Monday, April 29, 2024
घरदेश दुनियाभारताने अफगाणिस्तानातून परत आणले १२९ नागरिक

भारताने अफगाणिस्तानातून परत आणले १२९ नागरिक

Google News Follow

Related

अफगाणिस्तानातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. तालिबानने काबुलवर ताबा मिळवल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. अफगाणिस्तानातून अनेक लोक पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताने देखील आपल्या नागरीकांना काबुलमधून वाचवले आहे.

अफगाणिस्तानात तालिबाननं एक-एक करून आतापर्यंत अनेक भागांवर आपला ताबा मिळवला आहे. खुद्द अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देखील पलायन केले आहे. अशावेळी या अशांत वातावरणात भारत, अमेरिका यांच्यासहीत जगातील अनेक देशांचे नागरिक अडकून पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतातील दूतावासात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसहीत अफगाणिस्तानात राहणाऱ्या १२९ भारतीय आणि इतर प्रवाशांना घेऊन ‘एअर इंडिया’चं एक विशेष विमान भारतात दाखल झाले.

अफगाणिस्तानातून परतलेल्यांच्या म्हणण्यानुसार, तालिबान्यांच्या वर्चस्वानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती आणखीनच खराब झाली आहे. कट्टरतावादी तालिबान आणखी भागांवर कब्जा मिळवत असताना वातावरण बिघडण्याचा अंदाज अनेकांना आला. अफगाणिस्तानात असलेल्या अनेकांना आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांची सुरक्षेची चिंता सतावतेय.

हे ही वाचा:

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे तिसरे पुण्यस्मरण

हुश्श…पुजारा, रहाणेला सूर गवसला

पवनदीप झाला इंडियन आयडल

भारताच्या स्वातंत्र्य दिनी लंडनमध्ये मोदी विरोधाची उचकी

याच कारणामुळे भारतानंच नाही तर देशातील अनेक देशांनी अफगाणिस्तानातील आपले दूतावास बंद करून आपल्या कर्मचाऱ्यांना आपापल्या देशात परत बोलावून घेतले आहे.

काबुल ताब्यात घेण्यासाठी तालिबानला जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, केवळ २४ तासांत काबूल तालिबान्यांनी ताब्यात आपल्या ताब्यात घेतलंय. काबुल ताब्यात घेण्यासाठी त्यांना एकही गोळी देखील झाडावी लागली नव्हती. यावरून तालिबानची ताकद आणि धास्ती सहजच लक्षात येऊ शकेल.

अफगाणिस्तानात तालिबानच्या या वर्चस्वामुळे अल-कायदा, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तायबा तसंच आयसिस यांसारख्या दहशतवादी संघटनांना पुन्हा एकदा बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा