आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ विकेट्सने पराभूत करत शानदार विजय मिळवला आणि जेतेपदावर आपले नाव कोरले. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने अपराजित कामगिरी करत एकही सामना न गमावता हा विजय मिळवला. विशेषतः, तिलक वर्माने नाबाद ६९ धावा करत सामना जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, तर कुलदीप यादवने शानदार मारा करत ४ विकेट्स घेतल्या.
पाकिस्तानमध्ये संतप्त प्रतिक्रिया
भारताच्या विजयानंतर पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांचा संताप उफाळून आला आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानी चाहते आपल्या संघावर राग व्यक्त करताना दिसत आहेत.
एका व्हिडिओमध्ये, एक पाकिस्तानी चाहता म्हणतो, “भारत आमचा बाप होता आणि नेहमीच राहील. आमच्यात हिंमत नाही; आम्ही भारताविरुद्ध जिंकू शकत नाही. आमचे वंशजही त्यांना हरवू शकणार नाहीत. क्रिकेट हा आमचा एकमेव आनंद होता, तोही भारताने हिरावून घेतला. आम्ही त्यांच्या जोड्यांच्या लायक देखील नाही.”
हे ही वाचा :
“देशाचे नेते फ्रंटफूटवर फलंदाजी करतात तेव्हा…” मोदींबद्दल काय म्हणाला सूर्यकुमार?
भारत ते भूतान रेल्वे प्रवास लवकरच! ४,०३३ कोटी रुपयांची गुंतवणूक
मेलोनी यांच्या आत्मचरित्राच्या भारतीय आवृत्तीची नरेंद्र मोदींनी लिहिली प्रस्तावना
दुसऱ्या व्हिडिओमध्ये काही चाहते आपला राग अधिक तीव्रतेने व्यक्त करताना दिसतात. एका युवकाने म्हटले, “त्यांना तोफांना बांधून उडवून दिलं पाहिजे.” तर दुसरा म्हणतो: “आम्ही सहा दिवसांपासून राग आवरतोय, आता ऐकावंच लागेल. आम्ही भारताविरुद्ध कधीच जिंकू शकत नाही, हेच सत्य आहे.”







