27.3 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरदेश दुनियाभारतात आज दाखल होणार स्पुतनिक लस

भारतात आज दाखल होणार स्पुतनिक लस

Google News Follow

देशात सध्या कोविडने हाहाकार माजवला आहे. रोजच्या रोज देशभरात लक्षावधी नागरिक कोरोनाने बाधित होत आहे. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण हा एक सशक्त पर्याय म्हणून उपलब्ध झाला आहे. भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन सोबतच स्पुतनिक-५ लसीचे डोस सुद्धा भारतात आज पोहोचणार आहेत.

भारताच्या लसीकरण मोहिमेची मदार आजपर्यंत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींवर अवलंबून राहिली आहे. परंतु सध्या लसीकरणचा परिघ वाढवण्यासाठी अधिकाधीक लसींची गरज आहे. केंद्र सरकारने ही गरज लक्षात घेऊन इतर चार लसींना देखील मान्यता दिली आहे. त्यापैकी रशियाने निर्माण केलेल्या स्पुतनिक लसीची पहिली खेप आज भारतात दाखल होणार आहे. ही खेप हैदराबाद येथे दाखल होणार असल्याचे समजते.

हे ही वाचा:

बंगालची विधानसभा निवडणूक आणि संभाव्य  निकाल

शीतल जोशी-कारूळकर सेन्सॉर बोर्डावर

बंगालची विधानसभा निवडणूक आणि संभाव्य  निकाल

प्रशांत किशोर संन्यास घेणार की यु टर्न?

लॅन्सेट या जगप्रसिद्ध वैद्यकशास्त्रातील नियतकालिकानुसार या लसीची परिणामकारकता ९१.६% आहे. ही लस १८ वर्षांवरील सर्वांना देण्यास योग्य असल्याचे सांगितले जात आहे. ही लस उणे १८ अंश सेल्सियसवर द्रवरूपात साठवून ठेवावी लागते. परंतु ही लस २ ते ८ अंश सेल्सियसवर गोठवलेल्या कोरड्या स्वरूपातही साठवता येते, त्यामुळे या लसीचे वहन सुकर होईल.

आजपासून देशात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी अधिकाधीक लसींची गरज भासणार आहे. त्यापैकी पहिली स्पुतनिक लस भारतात आज दाखल होणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा