32 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरदेश दुनियापॅलेस्टाइनसमर्थनार्थ निदर्शनांदरम्यान झालेल्या अटकांबद्दल भारताची अमेरिकेवर टीका

पॅलेस्टाइनसमर्थनार्थ निदर्शनांदरम्यान झालेल्या अटकांबद्दल भारताची अमेरिकेवर टीका

‘योग्य समतोल सुनिश्चित करा’

Google News Follow

Related

‘सर्व लोकशाही राष्ट्रांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सार्वजनिक सुरक्षा आणि सुव्यवस्था यांच्यातील योग्य संतुलन सुनिश्चित केले पाहिजे’, असे भारताने गुरुवारी म्हटले आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रमुख विद्यापीठांमध्ये पॅलेस्टाईन समर्थक निदर्शनांदरम्यान शेकडो आंदोलकांना अटक केल्यानंतर भारताने ही प्रतिक्रिया दिली आहे.

भारतातील मानवी हक्क आणि राजकीय परिस्थितीवर टीका करणाऱ्या अमेरिकन प्रशासनावर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी टीका केली. ‘लोकशाही ही आपण घरात काय करतो, यावरून तपासली जाते, आपण परराष्ट्रांबाबत काय बोलतो, यावर नाही,’ असे जैस्वाल पत्रकार परिषदेत म्हणाले.

दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात सुमारे १०० आंदोलक विद्यार्थ्यांना आणि बुधवारी ऑस्टिनमधील टेक्सास विद्यापीठात डझनभर अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली. बुधवारी बोस्टनमधील इमर्सन कॉलेजमध्ये पॅलेस्टाईन समर्थक निदर्शनांदरम्यान १००हून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली आणि चार पोलिस अधिकारी जखमी झाले.

कोलंबिया विद्यापीठात गेल्या आठवड्यात निदर्शने सुरू झाली आणि निदर्शकांनी विद्यापीठे आणि अमेरिकन प्रशासनाला इस्रायली शैक्षणिक संस्थांशी संबंध तोडण्याचे आणि इस्रायली सैन्याला शस्त्रे पुरवणे थांबवण्याची मागणी केली आहे. बायडेन प्रशासनाने गेल्या वर्षी हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इस्रायलला लष्करी सामग्री देण्याच्या तरतुदीचे समर्थन केले आहे.

हे ही वाचा:

दिल्ली विमानतळावर फिरत होता सिंगापूर एअरलाईन्सचा बनावट पायलट!

हॉर्लिक्स आता आरोग्यदायी पेय नाही; ‘फंक्शनल न्यूट्रिशनल ड्रिंक’ म्हणून नोंद!

सियाचीनजवळ चीनव्याप्त काश्मीरमध्ये चीनकडून रस्ता बनवण्याचा प्रयत्न

यूट्यूबर मनीष कश्यपचा भाजपमध्ये प्रवेश!

गाझा पट्टीवर इस्रायली सैन्याच्या बॉम्बस्फोटात ३४ हजारांहून अधिक जण मारले गेले आहेत. याबाबत अमेरिका, ब्रिटन, आणि अनेक युरोपीय देशांमधील शहरांमध्ये पॅलेस्टाईन समर्थक निदर्शने झाली आहेत. अमेरिकन कॅम्पसमधील निषेध आणि भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल विचारले असता जयस्वाल यांनी बाजू मांडली. ‘प्रत्येक लोकशाहीत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जबाबदारीची भावना आणि सार्वजनिक सुरक्षा आणि सुव्यवस्था यांच्यात योग्य संतुलन असणे आवश्यक आहे,’ असे ते म्हणाले.

‘लोकशाहीने, विशेषतः, इतर सहकारी लोकशाहींच्या संदर्भात ही समज दर्शविली पाहिजे. शेवटी, आपण परदेशात काय बोलतो यावर नाही तर आपण घरी काय करतो यावर लोकशाही तपासली जाते,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेच्या कॉलेज कॅम्पसमध्ये होणारी पॅलेस्टाईन समर्थक निदर्शनांचा उल्लेख भयावह असा केला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा