28 C
Mumbai
Wednesday, December 31, 2025
घरदेश दुनियाइराणमध्ये दहा हजारांहून अधिक अडकलेल्या भारतीयांना भूमार्गाद्वारे बाहेर पडण्याची मिळाली परवानगी!

इराणमध्ये दहा हजारांहून अधिक अडकलेल्या भारतीयांना भूमार्गाद्वारे बाहेर पडण्याची मिळाली परवानगी!

भारताने केली होती विनंती

Google News Follow

Related

इस्रायलने प्रमुख शहरांवर बॉम्बहल्ला सुरू ठेवत असताना, इराणमध्ये अडकलेल्या किमान १०,००० विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी नवी दिल्लीने केलेल्या विनंतीला तेहरानने सोमवारी (१६ जून) प्रतिसाद दिला. भारताच्या विनंतीला प्रतिसाद देत, इराणने नमूद केले आहे की त्यांनी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे, विद्यार्थी अझरबैजान, तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तानात प्रवेश करण्यासाठी त्यांच्या जमिनीच्या सीमा वापरू शकतात.

भारत सध्या इराणमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या मोहिमेवर विचार करत आहे. तत्पूर्वी, तेहरानमधील भारतीय दूतावासाने सांगितले की ते सुरक्षा परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत आणि इराणमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्याशी सतत संपर्कात आहोत.

“काही प्रकरणांमध्ये, विद्यार्थ्यांना इराणमधील सुरक्षित ठिकाणी दूतावासाच्या मदतीने स्थलांतरित केले जात आहे. इतर व्यवहार्य पर्यायांची देखील तपासणी सुरू आहे. पुढील अपडेट्स नंतर येतील,” असे भारतीय दूतावासाने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, काल (१५ जून) रात्री तेहरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मुलांच्या वसतिगृहाजवळ हल्ला झाला. यात काश्मीरमधील दोन भारतीय विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने, दोघांचीही प्रकृती स्थिर आहे आणि सुरक्षिततेसाठी विद्यापीठाने त्यांना रामसर येथे हलवले आहे.

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान

अर्कमूळ : अनेक समस्यांवर करते उपचार

मुंबईतील दोन शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

१९८० नंतर रुमेटॉइड आर्थरायटीसच्या प्रकरणांमध्ये का वाढ होतेय…

इराणमध्ये अडकलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी त्यांना बाहेर काढण्याची विनंती भारतीय अधिकाऱ्यांना केली आहे. एका विद्यार्थ्याने एएनआयला सांगितले की ते तीन दिवसांपासून झोपलेले नाहीत. “शुक्रवारी पहाटे २:३० वाजता मी मोठ्या स्फोटांनी जागा झालो आणि तळघराकडे धाव घेतली. तेव्हापासून आम्ही झोपलो नाही,” असे २२ वर्षीय एमबीबीएस विद्यार्थी इम्तिसाल मोहिदिनने एएनआयला सांगितले. जम्मू आणि काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीने (JKPCC) या विद्यार्थ्यांना इराणमधून बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्री ए जयशंकर यांना व्यवस्था करण्यास सांगितले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा