अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील सामरिक भागीदारीला नवा आयाम मिळाला आहे. ईरानच्या तीन मुख्य अणुऊर्जा केंद्रांवर (फोर्डो, नतांज आणि इस्फाहान) अमेरिका हवाई हल्ला करून त्यांना उद्ध्वस्त केल्याचा दावा करत आहे. या कारवाईनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे आभार मानले आहेत आणि एक भावनिक संदेश दिला आहे.
हिब्रू भाषेतील व्हिडीओ स्टेटमेंटमध्ये नेतान्याहूंनी म्हटलं आहे की, “इजरायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने जे ऑपरेशन १३ जूनला सुरू केलं होतं, तेच काम अमेरिकेने पूर्ण केलं आहे.” ते पुढे म्हणाले, “मी संघर्षाच्या सुरुवातीला जाहीर केलं होतं की ईरानच्या अणु सुविधांना नष्ट केलं जाईल. आज हे वचन पूर्ण झालं आहे.” नेतान्याहूंनी सांगितले की, अमेरिकेचा हल्ला पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डोनाल्ड ट्रंप यांना फोन करून अभिनंदन केलं. हा अत्यंत आपुलकीचा आणि भावनिक संवाद होता. नेतन्याहूंनी ट्रंप यांचं वर्णन “इजरायलचे असे मित्र ज्यांच्यासारखा कोणीच नाही”, अशा शब्दांत केलं.
हे ही वाचा:
अहमदाबादमध्ये १४८व्या रथयात्रेची तयारी जोमात
केंद्र सरकारने सुरु केले नाविन्यपूर्ण ‘स्टार्टअप चॅलेंज’
अतुल भातखळकरांचा कांदिवलीत योगाभ्यास!
सिंगापूरच्या पंतप्रधानांचा सीएमजीला विशेष मुलाखत
ट्रंप काय म्हणाले?
राष्ट्राला संबोधित करताना डोनाल्ड ट्रंप म्हणाले की, “आता दोनच पर्याय आहेत – शांतता किंवा विनाश. ट्रंप म्हणाले, “इराणच्या अणु क्षमता (न्यूक्लियर एनरिचमेंट कॅपेसिटी) नष्ट करणे हेच उद्दिष्ट होतं. अजूनही काही लक्ष्य उरलेली आहेत. जर लवकरच शांतता प्रस्थापित झाली नाही, तर अमेरिका अधिक सर्जिकल आणि अचूक हल्ले करेल.” हवाई हल्ल्यानंतर इस्रायलच्या अनेक भागांमध्ये हवाई हल्ला सायरन वाजवण्यात आले आहेत. इराणनेही प्रत्युत्तर म्हणून इस्रायलवर ३० पेक्षा अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, ज्यात १६ जण जखमी झाले.
