आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशासह जगभरात योग दिन साजरा केला जात आहे. यंदाचा हा ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” (Yoga for One Earth, One Health) अशी यंदाची आंतरराष्ट्रीय योग दिनाची जागतिक थीम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशाखापट्टणममध्ये ५ लाख लोकांसोबत सामूहिक योग केला. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी योगाभ्यास केला. यावेळी मोठ्या प्रमाणात पुरुष महिलांचा सहभाग दिसून आला.
याबाबत आमदार भातखळकरांनी ट्वीटकरत माहिती दिली आणि सोबत योगाभ्यास करतानाचे फोटोही शेअर केले. यावेळी त्यांनी लोकांना संबोधित देखील केले. ट्वीटकरत ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे गेली काही वर्षापासून योग दिन जगभरात साजरा होतोय. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माझ्या कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघातील अशोक नगर येथे प्रेक्षा फाऊंडेशन तर्फे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मोठ्या संख्येने उपस्थित बंधू-भगिनींसोबत मीही शिबिरात योगासन, प्राणायाम व प्रेक्षाध्यानाचा अभ्यास केला. उपास्थित योग प्रशिक्षक, प्रशिक्षणार्थी यांच्यासह ‘एक पेड माँ के नाम’ अभिनव उपक्रमांतर्गत वृक्षारोपणही केले. यावेळी त्यांनी लोकांना संबोधित करताना म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा. नरेंद्र मोदी जेव्हा देशाचे पंतप्रधान बनले, तेव्हापासून २०१५-१६ नंतर संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो.
हे ही वाचा :
लिडियन नादस्वरम यांची नवीन प्रोजेक्टची घोषणा
भारतातील कृषी, ग्रामीण कामगारांसाठी महागाईत घट
इस्रायलचे हल्ले मोठे संकट निर्माण करू शकतात
इराणवर हल्ले थांबवण्यास इस्रायलला सांगणे कठीण
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे येथे जागतिक योग दिनानिमित्त तन-मन-आत्मा यांचे संतुलन साधणारा ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्यांनी लाखो वारकऱ्यांना संबोधित केले. मुख्यमंत्री म्हणाले की, योग ही आपली परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आणि चिकित्सापद्धती आहे. यात शरीर आणि मन यांचे पुनरुज्जीवन करण्याची विलक्षण क्षमता आहे.
हे प्राचीन भारतीय ज्ञान जगाने स्वीकारावे, या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघामध्ये योगदिनाचा प्रस्ताव मांडला. संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात असा एकमेव प्रस्ताव आहे, ज्याला उपस्थित सर्व देशांनी पाठिंबा दिला आणि तो संमत झाला. त्यामुळे गेले ११ वर्षे आपण जागतिक योग दिन साजरा करत आहोत.
आंतरराष्ट्रीय योग दिवस… pic.twitter.com/6uDhZtZsGS
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 21, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे गेली काही वर्षापासून योग दिन जगभरात साजरा होतोय. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माझ्या कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघातील अशोक नगर येथे प्रेक्षा फाऊंडेशन तर्फे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मोठ्या संख्येने उपस्थित… pic.twitter.com/MbNW3UJCu8— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 21, 2025
