27.5 C
Mumbai
Friday, July 11, 2025
घरविशेषअचूक हल्ल्यात कुद्स फोर्सचे दोन वरिष्ठ कमांडर ठार

अचूक हल्ल्यात कुद्स फोर्सचे दोन वरिष्ठ कमांडर ठार

Google News Follow

Related

इज्रायली डिफेन्स फोर्सेस (IDF) ने शनिवारी दावा केला की, त्यांच्या अचूक हल्ल्यांत ईराणच्या कुद्स फोर्सचे दोन वरिष्ठ कमांडर – सईद इजादी आणि बेहनाम शाहरियारी हे पश्चिम ईराणमध्ये ठार झाले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत आयडीएफने म्हटले : “इज्रायलचा नाश करण्याच्या ईराणी शासनाच्या योजनांचे सूत्रधार सईद इजादी आमच्या अचूक हल्ल्यात ठार झाले आहेत.”

सईद इजादी हे कुद्स फोर्सच्या ‘फिलिस्तीन कोर’चे कमांडर होते आणि ते ईराण व हमास यांच्यात मुख्य समन्वयक, तसेच ७ ऑक्टोबरच्या नरसंहाराचे प्रमुख आयोजक होते, असेही आयडीएफने म्हटले. आयडीएफनुसार, “इजादी यांनी IRGC (Islamic Revolutionary Guard Corps) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि हमासच्या प्रमुखांशी लष्करी समन्वय साधण्याची जबाबदारी पार पाडली होती. ते ईराणकडून हमासला आर्थिक मदत पोहोचवण्याच्या कामातही सामील होते, ज्याचा उद्देश इज्रायलविरोधी दहशतवादी मोहिमांमध्ये मदत करणे होता.”

हेही वाचा..

एनएसई आयपीओसंदर्भात अडथळा नाही

बिहारने सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेची रक्कम वाढवली

केंद्र सरकारने सुरु केले नाविन्यपूर्ण ‘स्टार्टअप चॅलेंज’

सोनिया गांधी यांना परराष्ट्र धोरणाची समज नाही

“युद्धाच्या काळात त्यांनी लेबनॉनमधून हमासचे बल संचालन केले. त्यानंतर ते हमासच्या लष्करी पुनर्रचनेत आणि गाझावर वर्चस्व टिकवून ठेवण्यात सक्रिय होते.” दुसऱ्या पोस्टमध्ये, एका गाडीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ शेअर करत आयडीएफने बेहनाम शाहरियारी यांच्याही मृत्यूचा दावा केला. “IRGC कुद्स फोर्सच्या ‘वेपन ट्रान्सफर युनिट’चे कमांडर बेहनाम शाहरियारी, पश्चिम ईराणमध्ये आमच्या अचूक हल्ल्यात ठार झाले,” असे त्यांनी नमूद केले.

शाहरियारी हे ईराण शासनाकडून मध्यपूर्वेतील विविध दहशतवादी संघटनांपर्यंत शस्त्रास्त्रे पोहोचवण्याचे प्रमुख सूत्रधार होते. “ते दरवर्षी शेकडो दशलक्ष डॉलर्स ची आर्थिक मदत आणि शस्त्रांची देवाणघेवाण करण्याचे नेतृत्व करत होते.” “या शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून इज्रायली नागरीक आणि सैनिकांचे मृत्यू आणि जखमी होणे यास कारणीभूत ठरले. पश्चिम ईराणमध्ये प्रवास करत असताना, इज्रायलपासून १,००० किलोमीटर दूर त्यांना ठार करण्यात आले. IDFने शेवटी लिहिले: “युद्धाच्या दरम्यान आयडीएफला झालेल्या मोठ्या नुकसानानंतर, इज्रायलभोवतालच्या दहशतवादी संघटनांनी पुन्हा संघटित होण्याच्या आणि बळकट होण्याच्या क्षमतेला हा एक गंभीर झटका आहे.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा