शहरी नक्षलवाद आणि ‘तुकडे तुकडे गँग’नंतर आता दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांनीही प्रवेश केला आहे. ‘सिख्स फॉर जस्टिस’ या दहशतवादी संघटनेने दिल्लीत सुरू असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनांसाठी निधी देण्याची घोषणा केली आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू व्हायरल व्हिडीओमधून तरुणांची माथी भडकवताना दिसत आहे. यादरम्यान, आणखी एक बातमी समोर येत आहे. अभिजीत दिपके यांनी जंतर मंतर मैदान सोडले आहे. अभिजीत दिपके यांनी सांगितले की, ‘शरीरामध्ये ताप आहे. मला आराम करण्याची आणि तब्येत व्यवस्थित करण्याची आवश्यकता आहे. मी सायंकाळपर्यंत पुन्हा आंदोलनात सहभागी होईल.’
I’ve been down with a fever and severe body pain for the last few days, but I’ve been pushing through with painkillers.
My apologies if you don’t see me at Jantar Mantar today. I need to get a few hours of rest and recover.
Will be back at the protest site by evening.
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) July 23, 2026
पन्नूने ‘एक्स’ वर एक व्हिडिओ पोस्ट करून कॉकरोच जनता पार्टीसाठी १० लाख डॉलर्सची देणगी जाहीर केली आहे. म्हटले की, “मोदींना सत्तेवरून हटवण्यासाठी. मोदींचे १५ ऑगस्टचे सोहळे थांबवण्यासाठी. सरन्यायाधीशांना एक संदेश. आपण सर्व सहमत आहोत की ‘दिल्ली-मोदींचे पतन निश्चित आहे.'”
पैसे कहॉं से आ रहे हैं? साज़िश क्या है? पिछले 20 दिनों में राहुल गांधी जी विदेश यात्रा में किन किन लोगों से मिले? असली खिलाड़ी कौन? https://t.co/csNggsAtXg
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) July 22, 2026
त्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “आमच्या झूम मीटिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे, तरुणांसाठी एकमेव खरा उपाय म्हणजे ‘भारताचे विघटन, फाळणी आणि बाल्कनीकरण’ आहे. मी झूम मीटिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे पुनरुच्चार करतो की, एसएफजे (SFJ) विद्यार्थी चळवळीला १० लाख डॉलर्स देत आहे. यासाठी काही अटी आहेत: सीजेपीच्या विद्यार्थ्यांनी मोदी सरकारसोबत कोणत्याही वाटाघाटी करण्यास नकार दिला पाहिजे. सीजेपीच्या विद्यार्थ्यांनी १५ ऑगस्टपर्यंत आपले आंदोलन सुरू ठेवले पाहिजे.”
हे ही वाचा:
संसदेच्या दारात खडाजंगी! दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब
राहुल गांधींचे आंदोलन प्रामाणिक नव्हते, त्यांनी जंतरमंतरवर बसायला हवं होतं!
अनाहतची विजयी मुसंडी; क्वार्टर फायनलमध्ये धडक
शुम्बा बाहेर, झिम्बाब्वेची ताकद कमी!
पन्नूच्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “विद्यार्थ्यांसाठी किंवा शिखांसाठीही १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन नाही. आम्ही १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर भारतीय पंतप्रधानांना अडवू आणि मोदींना स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याचे नेतृत्व करण्यापासून रोखू. त्यानंतर, १६ ऑगस्ट रोजी, पंजाबला भारतीय ताब्यापासून मुक्त करण्यासाठी एसएफजे इंडियानापोलिसमध्ये खलिस्तान सार्वमताचे आयोजन करेल.”
त्या पोस्टमध्ये विद्यार्थ्यांना चिथावणी देत म्हटले आहे, “सीजेपीच्या विद्यार्थ्यांनो, जेव्हा तुमच्याच भाजप सरकारने तुमच्यावर गोळीबार केला, तेव्हा तुम्ही गुरु हरिकृष्ण साहिब यांच्या बंगला साहिब गुरुद्वारात आश्रय घेतला. यावरून हे स्पष्ट होते की शीख अजूनही तरुणांचे रक्षक आहेत. मी सीजेपीच्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो की मोदींना सत्तेवरून हटवण्यासाठी सार्वमत जाहीर करा. दहा लाख डॉलर्सची मदत लवकरच मिळणार आहे.” अशी घोषणा करून पन्नूने देशविरोधी कारवायांमध्ये असलेला सहभाग दर्शवला आहे.







