28 C
Mumbai
Monday, September 7, 2026
घरदेश दुनियाहरियाणात भाविकांच्या पिकअपची ट्रकला जोरदार धडक; ६ जणांचा मृत्यू

हरियाणात भाविकांच्या पिकअपची ट्रकला जोरदार धडक; ६ जणांचा मृत्यू

खाटू श्याम-सालासर दर्शनानंतर मथुरेकडे जाताना भीषण अपघात

Google News Follow

Related

हरियाणातील कुंडली-मानेसर-पालवल (KMP) एक्सप्रेसवेवर मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. राजस्थानमधील खाटू श्याम आणि सालासर बालाजीचे दर्शन घेऊन मथुरा-वृंदावनच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत पिकअपचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या भीषण अपघातात सहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून १४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असून विजय सिंग, राजकुमार, रेश्मा देवी, कमला देवी, सुधा आणि महेश अशी त्यांची नावे आहेत. सर्व मृत आणि जखमी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर वाहनात अनेक प्रवासी अडकले होते. घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी बचावकार्य करत जखमींना बाहेर काढले आणि तातडीने पलवल येथील जिल्हा नागरी रुग्णालयात दाखल केले.
हे ही वाचा:
मोदींसोबत पुतिन-जिनपिंग यांची दिलखुलास भेट; शहबाज शरीफ पाहतच राहिले

पुण्यात रिक्षा प्रवास महागला; किमान भाडे ३० रुपये

उत्तराखंडमध्ये मान्यता नसलेले मदरसे होणार बंद!

मुंबईत सीएनजी २ रुपये, तर पीएनजी १ रुपयाने महागले

प्राथमिक माहितीनुसार, पिकअप चालकाला पहाटेच्या प्रवासादरम्यान डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते उभ्या ट्रकवर जाऊन आदळले, असे एका जखमी भाविकाने सांगितले. हे भाविक शुक्रवारी धार्मिक यात्रेसाठी घरातून निघाले होते. राजस्थानमधील धार्मिक स्थळांचे दर्शन घेतल्यानंतर ते मथुरा-वृंदावनकडे परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून अपघाताच्या कारणांचा अधिक तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा