मध्य जपानमधील एका कारखान्यात झालेल्या चाकू हल्ल्यात १४ जण जखमी झाले. या दरम्यान अज्ञात द्रवपदार्थही फवारण्यात आला होता, अशी माहिती स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सर्व जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
टोकियोच्या पश्चिमेकडील मिशिमा येथील एका रबर कारखान्यात एका व्यक्तीने लोकांवर चाकूने वार केले. घटनेनंतर हल्लेखोराला कारखान्यातून ताब्यात घेण्यात आले. जखमी १४ लोकांना आपत्कालीन सेवांद्वारे रुग्णालयात नेण्यात आले, असे शिझुओका प्रदेशातील मिशिमा शहरातील अग्निशमन विभागाचे अधिकारी तोमोहारू सुगियामा यांनी सांगितले. सुगियामा म्हणाले की, त्यांना दुपारी ४:३० वाजता एका रबर कारखान्यातून फोन आला की, पाच- सहा जणांवर कोणीतरी चाकूने हल्ला केला आहे आणि एक द्रव फवारले आहे. यानंतर संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या कृत्यामागील कारणे शोधण्याचे काम तपास यंत्रणा करत आहेत.
हे ही वाचा..
महिला अधिकारीच्या उपस्थितीत मॅनेजरवर बलात्कार; तिघांना अटक
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सौरभ भारद्वाज यांच्यासह तीन आप नेत्यांविरुद्ध एफआयआर
‘धुरंधर’चा १००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश
आझमगडमधील लंडनस्थित मौलवीला भारतातून मिळत होता पगार; प्रकरण काय?
संबंधित रबर कारखाना योकोहामा रबर कंपनी चालवते. त्यांच्याकडे ट्रक आणि बसेससाठी टायर तयार केले जातात. जपानमध्ये हिंसक गुन्हे तुलनेने दुर्मिळ घडतात तसेच जगातील सर्वात कठोर बंदूक कायदेही या देशात लागू आहेत. तथापि, अधूनमधून चाकूहल्ला आणि गोळीबाराच्या घटना घडतात, ज्यात २०२२ मध्ये माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येचा समावेश आहे. तर, २०२३ मध्ये झालेल्या गोळीबार आणि चाकूहल्ल्याच्या घटनेत दोन पोलिस अधिकाऱ्यांसह चार जणांचा मृत्यू झाल्याबद्दल ऑक्टोबरमध्ये एका जपानी व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.







