26 C
Mumbai
Monday, December 29, 2025
घरक्राईमनामाआझमगडमधील लंडनस्थित मौलवीला भारतातून मिळत होता पगार; प्रकरण काय?

आझमगडमधील लंडनस्थित मौलवीला भारतातून मिळत होता पगार; प्रकरण काय?

मौलाना शमसुल हुदा खान याच्याविरुद्ध मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल

Google News Follow

Related

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आजमगढ येथील इस्लामिक धर्मोपदेशक आणि ब्रिटनमध्ये राहणारा मौलाना शमसुल हुदा खान याच्याविरुद्ध मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने मौलाना याच्याविरुद्ध मनी लॉड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) चौकशी सुरू केली आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, शमसुल हुदा खान याच्यावर कट्टरपंथी विचारसरणीचा प्रचार आणि धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली बेकायदेशीर निधी मिळवण्याचे आरोप आहेत.

माहितीनुसार, शमसुल हुदा खान याची १९८४ मध्ये आझमगडमधील सरकारी अनुदानित मदरशात सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. यानंतर त्याने २०१३ मध्ये ब्रिटिश नागरिकत्व मिळवले मात्र, असे असले तरी, २०१३ ते २०१७ पर्यंत त्याला भारतात पगार मिळत राहिला, असा आरोप आहे. या काळात तो भारतीय नागरिक नव्हता किंवा अध्यापनातही गुंतलेला नव्हता. या काळात, त्याने ब्रिटनमध्ये धार्मिक प्रवचने देणे सुरू ठेवले. तपासात असे दिसून आले आहे की, गेल्या दोन दशकांत, शमसुल हुदा खान याने अनेक देशांमध्ये प्रवास केला आणि भारतात चालवल्या जाणाऱ्या ७ ते ८ बँक खात्यांद्वारे कोट्यवधी रुपये मिळवले.

ईडीच्या म्हणण्यानुसार, त्याने ३० कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या डझनहून अधिक स्थावर मालमत्ता खरेदी केल्या. एका एनजीओ आणि त्याच्या वैयक्तिक खात्यांद्वारे त्याने विविध मदरशांना निधी पुरवल्याचे वृत्त आहे. शमसुल हुदा खान याने आझमगड आणि संत कबीर नगर येथे दोन मदरसे स्थापन केले, ज्यांची मान्यता नंतर अधिकाऱ्यांनी रद्द केली. तपास संस्थांचे म्हणणे आहे की या संस्था परदेशी निधी वापरत असल्याचा आणि कट्टरपंथी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय आहे.

हे ही वाचा..

निवडणुकीच्या तोंडावर मातोश्रीजवळ पुन्हा परवानगीशिवाय ड्रोन चित्रीकरण; गुन्हा दाखल

‘बांगलादेशी’ असल्याच्या संशयावरून बंगालमधील स्थलांतरित कामगाराची हत्या

नायजेरियात ख्रिश्चनांना लक्ष्य करणाऱ्या आयसिसच्या दहशतवाद्यांवर अमेरिकेकडून हवाई हल्ले!

“बांगलादेशात जे घडतय ते…” दीपू दासच्या हत्येवर जान्हवी कपूर काय म्हणाली?

शमसुल हुदा खान याचे ब्रिटनमधील कट्टरपंथी संघटनांशी असलेले संबंध तपासले जात आहेत. शिवाय, त्याच्या पाकिस्तान भेटी आणि तेथील अतिरेकी संघटनांशी असलेले संबंध देखील तपासात आहेत. तपास यंत्रणांना वाटते की ते पाकिस्तानी कट्टरपंथी संघटना दावत-ए-इस्लामीशी जोडलेले असू शकतात. शमसुल हुदा खान याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम ३१८(४) आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा), १९९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आता त्याच्या निधी नेटवर्क, परदेशी संपर्क आणि मालमत्तेची सखोल चौकशी करत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा