26 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरदेश दुनियाशूटिंग दरम्यान महानायक जखमी

शूटिंग दरम्यान महानायक जखमी

हैदरबादमध्ये प्रोजेक्ट के या सिनेमादरम्यान झाली घटना

Google News Follow

Related

महानायक बिग बी ‘अमिताभ बच्चन’ यांना हैदराबाद मध्ये शूटिंग दरम्यान जखमी झाले आहेत. खुद्द बच्चन यांनीच आपल्या अपघाताची बातमी सोशल मीडियावर दिली आहे. सध्या ते आपल्या मुंबईतील निवासस्थानात आराम करत आहेत. प्रभासच्या ‘प्रोजेक्ट- के’ या चित्रपटाचे शूटिंग ते करत होते त्यामध्ये ऍक्शन  सिन चालू असताना त्यांच्या बारगड्यांना इजा झाली आहे. हैदराबादमध्ये प्राथमिक उपचारानंतर ते आता मुंबईत आले आहेत. अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या बरगडीच्या पिंजऱ्यातील स्नायू फाटले आहेत श्वास घ्याय ला पण त्रास होत असून हालातही येत नसल्यामुळे खूपच जास्त वेदना होत आहेत. या वेदना कमी करण्यासाठी मला काही औषधे देण्यात आली आहेत. आता यामधून सावरण्यासाठी मला काही आठवडे लागणार आहे.

पुढे बिग बी आपल्या ब्लॉगमध्ये लिहितात कि, मी पूर्ण बरा हॊइपर्यंत सर्व कामे थांबवण्यात आली आहेत. मी सध्या जलसा या निवासस्थानी विश्रांती घेत आहे. फक्त आवश्यक गोष्टींसाठी मला चालावे लागणार आहे. अराम तर करावाच लागणार आहे पण माझ्या चाहत्यांना मी जलसाच्या गेटवर भेटू शकणार नाही. हे सांगताना माळ अजिबात बरे वाटत नाही पण माझा नाईलाज आहे, जलाशयावर येण्याचा विचार करणाऱ्यांना सध्या त्यांना याची माहिती द्या बाकी सर्व काही ठीक आहे.

हे ही वाचा:

भ्रष्ट लालू आता आम आदमी पक्षाला वाटू लागले आपले

होळीच्या सणाला ‘पुरणपोळीच्या’ किमतीवरून शिमगा

‘आपल्याच पक्षातील आमदारांना संपवायचे आणि दुसरीकडून भाड्याने घ्यायचे, हे उद्धव ठाकरेंचे काम’

ओळखीच्या लोकांना गुड बाय मेसेज करून शिवराज पाटील चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या

दिवाळीपूर्वी अमिताभ यांच्या पायाची नास कापली गेल्याची माहिती त्यांनी दिली होती. तेव्हा सुद्धा ते आपल्या ब्लॉगमध्ये म्हणाले होते, पायाची नस कापल्यामुळे रक्तस्त्राव झाला होता. त्यावेळेस मला रुग्णालयात जावे लागले होते. तिथेच डॉक्टरांनी पायाला टाके घातले आहोत. लोखंडाचा एक तुकडा माझ्या उजव्या पायाला लागला होता. म्हणून माझी नास कापली होती. सहकारी अभिनेत्यांनी आणि डॉक्टर्समुळे मला वेळेवर उपचार केल्यामुळे मी लवकर बारा झालो आहे. ऑपेरेशन थिएटर मध्ये माझ्या पायाला काही टाकेही घालण्यात आले होते.
आता  महानायक अमिताभ बच्चन या दुखापतीमधून लवकर सावरून शूटिंगला यावेत अशीच चाहते आता शुभेच्छा करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा