28 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरराजकारणओळखीच्या लोकांना गुड बाय मेसेज करून शिवराज पाटील चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या

ओळखीच्या लोकांना गुड बाय मेसेज करून शिवराज पाटील चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या

चाकूरकर वृद्धापकाळाशी संबंधित आजार व मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

Google News Follow

Related

माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत बंधू चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांनी लातूर येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. रविवारी सकाळी ९ च्या सुमारास शिवराज पाटील यांच्या च्या देवघर या निवासस्थानी चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. त्यांच्या पश्चात २ मुले, विवाहित मुलगी, नातंवडे असा मोठा परिवार आहे.

चंद्रशेखर (८१) हे हणमंतराव पाटील या नावानेही ओळखले जात होते.हणमंतराव पाटील हे माजी मंत्र्यांच्या ‘देवघर’ या निवासस्थानाजवळच राहत असत आणि त्यांची सतत ये-जा असायची. रविवारी सकाळीही ते नेहमीप्रमाणेच तिथे आले. सकाळी ८. ३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली. गोळी झाडल्याचा आवाज ऐकू येताच कुटुंबीय धावत बाहेर आले. त्यावेळी चंद्रशेखर पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले.

आत्महत्येची माहिती मिळताच त्याचे वकील पुत्र लिंगराज पाटील तातडीने घटनास्थळी पोहोचले.गेल्या काही वर्षांपासून ते कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त होते चंद्रशेखर पाटील  चाकूरकर वृद्धापकाळाशी संबंधित आजार व मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची दोन्ही मुले वकील आहेत. या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

हे ही वाचा :

९ मार्चपासून आम्हाला घालू द्या हिजाब! कर्नाटक सरकारचे हे पाऊल…

विमानातील लघुशंकेचे नवे प्रकरण आले समोर…आता एका विद्यार्थ्याने केले कृत्य

सुप्रिया सुळे मांसाहार करून देवदर्शनाला , शिवतारे यांच्या पोस्टमुळे रंगली चर्चा

मनसे नेते संदीप देशपांडेच्या हल्लेखोरांचा ठाण्यांत शोध

आत्महत्येपूर्वी पाठवले गुडबाय मेसेज
आत्महत्या करण्याच्या आधी त्यांनी काही ओळखीच्या लोकांना गुड बाय असा टेक्स्ट मेसेज केला होता. त्यानंतर काही वेळाने त्यांनी व्हॉट्सएपवरही त्याचे स्टेटस ठेवले होते. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेनंतर लातूरमध्ये खळबळ माजली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,877चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा