26 C
Mumbai
Monday, December 29, 2025
घरदेश दुनियाअवनीच्या सुवर्णपदकात महाराष्ट्राचेही मोठे योगदान! कसे ते जाणून घ्या...

अवनीच्या सुवर्णपदकात महाराष्ट्राचेही मोठे योगदान! कसे ते जाणून घ्या…

Google News Follow

Related

मूळच्या राजस्थानच्या अवनी लेखरा हिने टोकियो, जपान येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक खेळात नेमबाजीमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णविजेती कामगिरी करून तमाम भारतीयांची मने जिंकली आहेत. पण अवनीच्या या यशात महाराष्ट्राचंही योगदान आहे हे किती लोकांना ठाऊक आहे?

महाराष्ट्राची प्रख्यात नेमबाज सुमा शिरूर ही अवनीची खासगी प्रशिक्षक आहे आणि तिच्या मार्गदर्शनाखाली अवनीने ही कामगिरी करून दाखविली आहे. त्यामुळे अर्थातच या सुवर्णपदकात महाराष्ट्राचेही मोठे योगदान आहे असे म्हणायाल हरकत नाही.

सुमाने यासंदर्भात ‘न्यूज डंका’शी खास टोकियोहून बातचीत करून अवनीच्या या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला. सुमा म्हणाली की, अवनीसारख्या दिव्यांग खेळाडूंसमोर खूप आव्हान असतात, पण त्या आव्हानांना मात देत तिने ही जबरदस्त कामगिरी करून दाखविली आहे. भारतात मी जेव्हा परत येईन तेव्हा एक विलक्षण समाधान मला असेल.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजीत यश मिळाले नाही, पण अवनीच्या रूपात भारताला सुवर्ण मिळाले त्यामुळे ती उणीव भरून निघाली का, यावर सुमा म्हणाली की, नक्कीच. ऑलिम्पिकमध्ये जी नेमबाजीत निराशा सहन करावी लागली त्याची भरपाई अवनीने करून दाखविली आहे.

सुमा म्हणाली की, २०१७मध्ये अवनीच्या वडिलांनी मला फोन केला होता आणि अवनीला प्रशिक्षण देण्यासाठी विनंती केली होती. पण एका दिव्यांग खेळाडूला आपण खरोखरच नीट प्रशिक्षण देऊ शकतो का, आपल्या ते शक्य होईल का याची खात्री नव्हती. त्यामुळे मी तयार नव्हते. पण २०१८ला पुन्हा एकदा तिच्या वडिलांनी माझ्याशी संपर्क साधला. मग मी थोडी तयारी केली आणि तिच्याकडून सराव करून घेऊ लागले. तेव्हा माझ्या लक्षात आले की, मी तिला आधीच प्रशिक्षण द्यायला हवे होते इतकी गुणवत्ता तिच्यात भरलेली आहे. तेव्हापासून ती पनवेलच्या रेंजवर सराव करू लागली. जयपूरहून ती खास सरावासाठी पनवेलला येत असे.

हे ही वाचा:

येमेनच्या सैन्यावर मोठा हल्ला

दार उघड उद्धवा दार उघड! मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद

ऐरोलीत नेलेला मासळी बाजार पुन्हा आला मूळ ठिकाणी; कसा झाला हा चमत्कार?

अवनी लेखराची सुवर्ण कामगिरी

सुमाने सांगितले की, मी तिला बाकीच्या सुदृढ मुलांसोबत खेळू देत असे. त्यामुळे तिचा आत्मविश्वास प्रचंड उंचावला. आता १० मीटर एअर रायफलमध्ये ती पात्रता फेरीत सातवी आली. थोडीशी दडपणाखाली होती पण मी तिच्याशी ३-४वेळा बोलले होते. तिला थोडा दिलासा मिळाला. अंतिम फेरीत मात्र ती पूर्णपणे दडपणमुक्त होती.

सुमा म्हणाली की, अगदी लहान असताना अवनीला अपघात झाला आणि त्यात तिचे पाय अधू झाले. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला स्पोर्टसमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय अचूक ठरला आहे.

अवनी आता आणखी तीन नेमबाजी प्रकारात सहभागी होणार आहे. त्यातील तिच्या हमखास यश देणाऱ्या प्रकारात तिने सुवर्ण मिळविले आहे. आता थ्री पोझिशनमध्ये तिला अपेक्षा आहेत. त्याशिवाय, १० मीटर प्रोन आणि ५० मीटर प्रोन या प्रकारातही ती खेळणार आहे.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा