26 C
Mumbai
Tuesday, September 28, 2021
घरविशेषदार उघड उद्धवा दार उघड! मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद

दार उघड उद्धवा दार उघड! मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद

Related

कोरोनाचे नियम न जुमानता राज्यभरात मोठ्या गर्दीत राजकीय यात्रा आणि सभांना परवानगी आहे, हॉटेल्स मॉल सुरु झाली, मात्र मंदिरात जाण्यासाठीच भाविकांना का रोखले जाते. फक्त मंदिरं खुली केल्यानेच कोरोना वाढतो, का असा सवाल करत भारतीय जनता पक्षाने आज राज्यभरात आंदोलनाला सुरुवात केली आहे.

भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात हे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. नाशिक, नागपूर, पंढरपूर, पुणे आणि औरंगाबाद, शिर्डी परिसरातील विविध स्थानिक भाजपा नेत्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध मंदिर परिसरात घंटानाद आणि शंखनाद करत भाजपाने मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांचे केंद्रस्थान मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्येही ही निदर्शनं झाली. भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या वतीने रामकुंड परिसरात आंदोलन करण्यात आलं. यावेळी साधू महंत आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. नाशिकमध्ये आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी महापौरांचीही उपस्थिती होती.  सरकारला टल्ली झालेले लोक चालतात, मग देवाच्या भक्तीत तल्लीन झालेले लोक चालत नाही, असा सवाल नाशिकमधील साधू-महंतांनी केला.

पुण्यातील भाजपा आघाडीनंही घोषणाबाजी करत आंदोलन केले. पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीच्या मंदिरात हे आंदोलन करण्यात आलं. हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की, अशी घोषणा देत आज जन्माष्टमीचा मुहूर्त साधत मंदिरं उघडण्यासाठी जोरदार मागणी केली. लोकभावनेचा आदर करत मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मंदिरं उघडावीत, अशी मागणी केली.

हे ही वाचा:

भारताला पॅरालिम्पिकमध्ये भरघोस यश

अवनी लेखराची सुवर्ण कामगिरी

ऐरोलीत नेलेला मासळी बाजार पुन्हा आला मूळ ठिकाणी; कसा झाला हा चमत्कार?

जन धनधनाधन; योजनेचा लाखो कुटुंबियांना लाभ

औरंगाादमध्येही शहर भाजपा आघाडीच्या वतीनं शहरातील मध्यवर्ती भागातील गजानन मंदिर परिसरात शंखनाद आणि घंटानाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत मंदिरं उघडण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,414अनुयायीअनुकरण करा
3,610सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा