33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरविशेषभारताला पॅरालिम्पिकमध्ये भरघोस यश

भारताला पॅरालिम्पिकमध्ये भरघोस यश

Google News Follow

Related

टोकियो पॅरालिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला आहे. देवेंद्र झाझरियानं रौप्यपदक तर सुंदर गुजरनं कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. त्यामुळे आलाफेकमध्ये भारतीय खेळाडूंच्या खात्यात आणखी दोन पदकांची भर पडली आहे. यासोबतच भारतानं आतापर्यंत पॅरालिम्पिकमध्ये ७ पदकांची कमाई केली आहे.

श्रीलंकेच्या मुडियांसेलगे हेराथने सुवर्णपदकावर नाव कोरलं. त्यानं ६७.७९ मीटरचा थ्रो केला. तसेच देवेंद्रनं ६४.३५ मीटर आणि सुंदर सिंहनं ६४.०१ मीटर लांब भाला फेकला. राजस्थानच्या चुरु जिल्ह्यातील देवेंद्र झाझरियानं यापूर्वी रियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं होतं. देवेंद्रच्या नावावर भारतासाठी दोन वेळा सुवर्णपदक जिंकल्याचा रेकॉर्ड आहे.

योगेश कथुनियाने २०१९ मध्ये दुबईत झालेल्या वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियन्सशिपमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. त्यामुळे त्याला टोकियो पॅरालिम्पिक्सचं तिकीट मिळालं. या स्पर्धेत त्याने पुढची मजल मारुन, रौप्य पदकाची कमाई केली. योगेशने पॅरा स्पोर्ट्समध्ये पहिल्यांदा सर्वांचं लक्ष २०१७ मध्ये वेधलं होतं.

योगेशची आंतरराष्ट्रीय कारकीर्द २०१८ पासून सुरु झाली. आशियाई स्पर्धेत योगेशने जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने चौथ्या स्थानापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर बर्लिनमध्ये पॅरा ऍथलिट ग्रां प्रीमध्ये योगेशने थाळीफेकीच्या इफ३६ प्रकारात ४५.१८ मीटर थाळीफेक करुन, वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं. टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये योगेश पहिल्यांदाच खेळत होता, पहिल्याच प्रयत्नात त्याने रौप्य पदक पटकावलं.

हे ही वाचा:

अवनी लेखराची सुवर्ण कामगिरी

ऐरोलीत नेलेला मासळी बाजार पुन्हा आला मूळ ठिकाणी; कसा झाला हा चमत्कार?

जन धनधनाधन; योजनेचा लाखो कुटुंबियांना लाभ

उद्धव ठाकरेंविरोधात कानपूरमध्ये तक्रार; वाचा सविस्तर…

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची नेमबाज अवनी लेखरा हिची सुवर्ण कामगिरी पाहायला मिळत आहे. १० मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखराला सुवर्ण पदक मिळालं आहे. दरम्यान, अवनी लेखरानं क्वॉलिफिकेश राउंडमध्ये सातवं स्थान पटकावलं होतं. अवनीनं यासोबतच आणखी एक इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी अवनी ही पहिली खेळाडू ठरली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा