29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरदेश दुनियामहाराष्ट्राची डरकाळी! जागतिक मानकांच्या व्याघ्र प्रकल्पात नवेगाव, मेळघाट, ताडोबा

महाराष्ट्राची डरकाळी! जागतिक मानकांच्या व्याघ्र प्रकल्पात नवेगाव, मेळघाट, ताडोबा

देशातील ६ व्याघ्र प्रकल्पांना जागतिक मानक

Google News Follow

Related

कंझर्व्हेशन ॲश्युअर्ड टायगर स्टँडर्ड्स (सीए/टीएस) या सर्वोच्च जागतिक व्याघ्र मानक संस्थेने वाघांच्या संवर्धनासाठी देशभरातील ६ व्याघ्र प्रकल्पांना जागतिक मानकाचा दर्जा बहाल केला आहे. यामध्ये महाराष्टातील ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांचा समावेश आहे.

देशातील ६ व्याघ्र प्रकल्पांमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प (महाराष्ट्र), पेरियार राष्ट्रीय उद्यान (केरळ), काली टायगर रिझर्व्ह (कर्नाटक), पिलीभीत व्याघ्र प्रकल्प (उत्तरप्रदेश), ताडोबा-अंधारी आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प (महाराष्ट्र) यांचा समावेश आहे. सीए/ टीएस या संस्थेने वाघांचे संरक्षण, अधिवासात वाढ आणि पोषक वातावरण निर्मिती करण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घेतल्यामुळेच येथे व्याघ्र संख्या वाढल्याचे शिक्कामोर्तब केले आहे.

स्वित्झरलॅंड येथील सीए/ टीएस या आंतरराष्ट्रीय संस्थेने वाघांच्या संरक्षणाबाबत ६ व्याघ्र प्रकल्पांना जागतिक मानकाचा दर्जा बहाल केल्याबाबतचे पत्र केंद्रीय वने, पर्यावरण मंत्रालयाने २४ मार्च २०२३ रोजी जारी केले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला ५० वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मिळालेले हे मानक मोठी कमाई मानली जाते आहे.

हे ही वाचा:

लांगुलचालन करत असतील तर उद्धव ठाकरेंना याचं उत्तर बाळासाहेब ठाकरेंना द्यावं लागेल

नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या द्रव्याने रुमाल पेटवून जाळण्याचा प्रयत्न; मुंब्र्यात घडली घटना

काळवीट मारल्यामुळे सलमानला ‘तो’ देत होता धमक्या; अखेर पोलिसांना सापडलाच

सर्वसामान्य लोक आता सौरऊर्जेला सरावलेत!

मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यांतर्गत येत असल्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी या उपलब्धीबद्दल विशेष आनंद व्यक्त केला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची ५० वर्षाकडे वाटचाल सुरू झाली असून, त्याचा जागतिक स्तरावर समावेश होणे ही अत्यंत गौरवाची बाब आहे. विशेषत: या व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांना पत्र वजा निमंत्रण दिले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीला ५० वर्षे पूर्ण होत आहे. आता सुवर्ण महोत्सवी वर्षात मेळघाट व्याघ्र प्रकल्पास वाघांचे संरक्षण, संवर्धानासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची मान्यता प्राप्त होणे म्हणजे मेळघाटने जागतिक स्तरावर भरारी घेतल्याचे मानले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा