29 C
Mumbai
Friday, September 25, 2026
घरदेश दुनियाअवघ्या ११ दिवसांत मोदी-पुतिन पुन्हा आमनेसामने; शुक्रवारी द्विपक्षीय भेट

अवघ्या ११ दिवसांत मोदी-पुतिन पुन्हा आमनेसामने; शुक्रवारी द्विपक्षीय भेट

‘एसयू-५७’सह संरक्षण सहकार्यावर चर्चा होण्याची शक्यता

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची शुक्रवारी, ११ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान द्विपक्षीय भेट होणार आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. या भेटीकडे जगाचे लक्ष लागणार असून भारत- रशिया संबंधांना कोणते नवे आयाम मिळणार याकडे लक्ष असणार आहे.

ब्रिक्स परिषदेसाठी पुतिन भारत दौऱ्यावर येणार असून, त्याचवेळी मोदी आणि पुतिन यांच्यात स्वतंत्र द्विपक्षीय चर्चा होणार आहे. दोन्ही नेत्यांची अलीकडेच ३१ ऑगस्ट रोजी किर्गिस्तानमधील बिश्केक येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेदरम्यान भेट झाली होती. आता अवघ्या काही दिवसांत दोन्ही नेते पुन्हा एकदा चर्चेसाठी भेटणार आहेत. या बैठकीत संरक्षण सहकार्याला विशेष महत्त्व मिळण्याची शक्यता आहे. रशियाच्या पाचव्या पिढीतील एसयू-५७ लढाऊ विमानांच्या संभाव्य खरेदी किंवा सहकार्याचा मुद्दा चर्चेत येऊ शकतो, असे बोलले जात आहे. याशिवाय दोन्ही देशांमधील व्यापार, ऊर्जा, गुंतवणूक आणि अणुऊर्जा क्षेत्रातील सहकार्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षण भागीदारीसोबतच ऊर्जा आणि व्यापार संबंधही बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे ठरू शकतात. दोन्ही देशांनी राष्ट्रीय चलनांमध्ये व्यापार आणि पेमेंट यंत्रणा मजबूत केली असून, रशियाच्या माहितीनुसार द्विपक्षीय व्यापारातील ९६ टक्के व्यवहार रुपया आणि रुबलमध्ये होत आहेत.

हे ही वाचा:

‘सर तन से जुदा’ ची तुलना ‘जय श्री राम’ घोषणेशी करता येणार नाही!

ऍनिमेशन वापरून पाकिस्तानचा युद्ध जिंकल्याचा बनाव

‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवर १५० कोटींची झेप!

दिल्लीतील पीजी दुर्घटनेतील अर्पितच्या डोळ्यांनी दुसऱ्याला मिळणार दृष्टी

दरम्यान, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक राजकारणातही या भेटीला महत्त्व आहे. गेल्या आठवड्यात बिश्केक येथे झालेल्या भेटीत पंतप्रधान मोदी यांनी युद्ध संपवून शांततेच्या दिशेने पुढे जाण्याची भूमिका मांडली होती. त्यामुळे आगामी चर्चेत युक्रेन संघर्ष आणि त्याचे जागतिक परिणाम हाही मुद्दा पुन्हा उपस्थित होण्याची शक्यता आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी रशियासह अनेक प्रमुख देशांचे नेते नवी दिल्लीत दाखल होणार आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा