32 C
Mumbai
Thursday, September 10, 2026
घरदेश दुनियाऍनिमेशन वापरून पाकिस्तानचा युद्ध जिंकल्याचा बनाव

ऍनिमेशन वापरून पाकिस्तानचा युद्ध जिंकल्याचा बनाव

पाकिस्तान एअर फोर्सकडून व्हिडीओ प्रसिद्ध

Google News Follow

Related

भारताने पाकिस्तान विरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानने वारंवार खोटे दावे केल्याचे समोर आले होते. दुसरीकडे भारताने सातत्याने वेळोवेळी हल्ल्यांचे फोटो, व्हिडीओ समोर ठेवत आणि प्रसिद्ध करत पाकिस्तानला जगासमोर खोटे पाडले. अशातच ‘डीक्लासिफाइडः ऑपरेशन सिंदूर’ या माहितीपटातून ऑपरेशन सिंदूरची तथ्यपूर्ण माहिती समोर आली. आता या माहितीपटाला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून पाकिस्तानच्या हवाई दलाने एक सोयीस्कर मार्ग शोधला आहे. त्यांनीही एक व्हिडीओ शेअर करत भारताच्या केलेल्या कारवाईला उत्तर दिल्याचे दाखवण्यासाठी पुराव्यांच्या जागी ऍनिमेशन वापरण्याचा मार्ग निवडला आहे.

पाकिस्तान एअर फोर्सने (PAF) ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय लष्करी लक्ष्यांवर हल्ले करून ती उद्ध्वस्त केल्याचा दावा करणारा ऍनिमेटेड व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. मात्र, या दाव्यांच्या समर्थनार्थ प्रत्यक्ष पुरावे व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेले नाहीत. यावरून सोशल मीडियावर पाकिस्तानची खिल्ली उडवली जात असल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तानच्या एअर फोर्स डेच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला. ‘फिझाओं के पसबान’ असे शीर्षक असलेल्या या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानने भारतीय हवाई दलाच्या तब्बल ३२ तळांवर हल्ला केला, दोन एस-४०० (S-400) हवाई-संरक्षण प्रणाली नष्ट केल्या आणि अनेक भारतीय विमाने पाडली. या व्हिडीओमध्ये प्रत्यक्ष युद्धातील फुटेजऐवजी ऍनिमेशन आणि संगणकीय दृश्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. विविध भारतीय लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. पाकिस्तानने आपल्या हल्ल्यांचे यश अधोरेखित करण्यासाठी या दृश्यांचा वापर केला आहे.

हे ही वाचा:

‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवर १५० कोटींची झेप!

दिल्लीतील पीजी दुर्घटनेतील अर्पितच्या डोळ्यांनी दुसऱ्याला मिळणार दृष्टी

ब्रिटनला नेलेले नागा पूर्वजांचे ३९ अवशेष भारतात आणणार

महिला कर्मचाऱ्यांवरील भेदभावाच्या आरोपांमुळे आयफेल टॉवर बंद

विशेष म्हणजे, पाकिस्तानने यापूर्वीही ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय लष्करी लक्ष्यांना मोठे नुकसान केल्याचे दावे केले होते. मात्र, नव्या व्हिडीओमध्ये या दाव्यांना पुष्टी देणारे स्वतंत्र किंवा प्रत्यक्ष पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या व्हिडीओवरून पाकिस्तानच्या दाव्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. ऑपरेशन सिंदूरवर आधारित डिस्कव्हरीच्या डॉक्युमेंटरीमध्ये प्रत्यक्ष संघर्षाशी संबंधित फुटेज आणि भारतीय अधिकाऱ्यांची माहिती समोर आल्यानंतर पाकिस्तानकडून या कथनाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
332,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा