29 C
Mumbai
Monday, September 28, 2026
घरदेश दुनियामहिला कर्मचाऱ्यांवरील भेदभावाच्या आरोपांमुळे आयफेल टॉवर बंद

महिला कर्मचाऱ्यांवरील भेदभावाच्या आरोपांमुळे आयफेल टॉवर बंद

BAPS प्रतिनिधीमंडळाच्या भेटीवरून वाद

Google News Follow

Related

जगप्रसिद्ध आयफेल टॉवरमध्ये महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणावरून बाजूला केल्याच्या आरोपांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हिंदू धार्मिक संघटना बीएपीएस (BAPS) शी संबंधित प्रतिनिधीमंडळाच्या भेटीदरम्यान महिला कर्मचाऱ्यांना दूर करण्यात आल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याने सोमवारी आयफेल टॉवर काही काळ पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला.

माहितीनुसार, शनिवारी बीएपीएसशी संबंधित सुमारे १०० जणांच्या प्रतिनिधीमंडळाने आयफेल टॉवरला खासगी भेट दिली होती. या भेटीदरम्यान महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यस्थळांवरून हटवून त्यांच्या जागी पुरुष कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधी डायन डावोइन यांनी सांगितले की, प्रतिनिधीमंडळ टॉवरमधून जात असताना महिला कर्मचाऱ्यांना त्यांची जागा सोडण्यास सांगण्यात आले आणि त्यांच्या जागी पुरुष कर्मचाऱ्यांना उभे करण्यात आले. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली.

आयफेल टॉवरच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करताना, महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या लिंगामुळे बाजूला करण्यात आले, त्यांची जागा इतरांनी घेतली आणि त्यांना जणू ‘अदृश्य’ करण्यात आले, असा आरोप केला. सप्ताहअखेर या मुद्द्यावर तणाव वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सोमवारी व्यवस्थापनासोबत चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. यामुळे एफिल टॉवरचे उद्घाटन उशिरा झाले आणि अखेर तो बंद ठेवण्यात आला.

हे ही वाचा:

दिशा सालियन प्रकरणात सचिन वाझे होणार साक्षीदार?

“उद्धव प्रमाणे राज ठाकरेही राजकीय कडेलोटाकडे”

आशिया कप फायनलआधी ट्रॉफीचा पेच!

लखीमपूरमध्ये चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या खलीलचे केले एन्काऊंटर

आयफेल टॉवरचे संचालन करणाऱ्या SETE या कंपनीनेही प्रतिनिधीमंडळाने महिलांशी होणारा संपर्क मर्यादित ठेवण्याची विनंती केल्याचे मान्य केले आहे. मात्र, अशा अटी स्वीकारायला नको होत्या, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार असून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही व्यवस्थापनाने म्हटले आहे. पॅरिसचे महापौर इमॅन्युएल ग्रेगोआर यांनी या घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. महिला आणि पुरुषांमधील समानता हा फ्रान्सचा मूलभूत मूल्य असून कोणत्याही परिस्थितीत महिलांबाबत भेदभाव सहन केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा