25 C
Mumbai
Sunday, September 13, 2026
घरराजकारण"उद्धव प्रमाणे राज ठाकरेही राजकीय कडेलोटाकडे"

“उद्धव प्रमाणे राज ठाकरेही राजकीय कडेलोटाकडे”

अतुल भातखळकर यांच्याकडून खरपूस समाचार

Google News Follow

Related

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना गणेशोत्सवाच्या काळात दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा दावा केला होता. त्यांच्या केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले असून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आमदार भातखळकर यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या अशाच आशयच्या पूर्वीच्या विधानाची आठवण करून देत खरपूस समाचार घेतला आहे.

अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, “उद्धव ठाकरे म्हणाले होते, रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या काळात देशभरात दंगली घडवल्या जातील, त्यानंतर संपूर्ण राजकीय कडेलोटाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु झाली होती. आणि आता राज ठाकरे म्हणत आहेत, गणेशोत्सवाच्या काळात दंगली घडवल्या जातील.” अशी टीका करून अतुल भातखळकर यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी दंगली घडवल्या जातील अशा आशयचे वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागल्याचे आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

मणिपूरमध्ये १० किलोचा आयईडी केला निकामी

लखीमपूरमध्ये चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या खलीलचे केले एन्काऊंटर

अमेरिकेत अमेझॉनच्या कार्गो विमानाचा अपघात; ५ जणांचा मृत्यू

पालघरमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण

राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यातील मनसेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात बोलताना गणेशोत्सवाच्या काळात दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा दावा केला होता. “गणपतीच्या दिवसांमध्ये दंगली घडवल्या जातील. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशात दंगली घडवल्या जातील,” असे ते म्हणाले होते. जात आणि धर्माच्या मुद्द्यांमध्ये जनतेला अडकवून बेरोजगारी, शिक्षण आणि आर्थिक प्रश्नांकडून लक्ष विचलित केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हिंदू आणि मुस्लिम समाजातील सुजाण नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. कोणत्याही अफवा किंवा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रकारांना बळी पडू नये, असेही त्यांनी म्हटले होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावरून आता भाजपकडून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा