29.3 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरक्राईमनामामणिपूरमध्ये १० किलोचा आयईडी केला निकामी

मणिपूरमध्ये १० किलोचा आयईडी केला निकामी

लष्कराची मोठी कारवाई

Google News Follow

मणिपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून भारतीय लष्कराने सुमारे १० किलो वजनाचा शक्तिशाली सुधारित स्फोटक यंत्र (आयईडी) शोधून तो सुरक्षितपणे निकामी केला. त्यामुळे स्थानिक नागरिक तसेच सुरक्षा दलांवरील संभाव्य मोठा धोका टळला.

भारतीय लष्कराच्या स्पीअर कोअरने आपल्या ‘एक्स’ खात्यावर दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्पीअर कोअरच्या पथकाने चुराचांदपूर जिल्ह्यातील दक्षिण थानजिंग जंगल परिसरात शोधमोहीम राबवली. यावेळी सुमारे १० किलो वजनाचा आयईडी आढळून आला. सुरक्षा पथकाने तो घटनास्थळीच सुरक्षित पद्धतीने निकामी केला. वेळीच करण्यात आलेल्या कारवाईमुळे स्थानिक नागरिक आणि सुरक्षा दलांवरील संभाव्य धोका टळला. तसेच परिसरातील सुरक्षित वाहतूक सुनिश्चित झाली. नागरिकांचे प्राण वाचवणे आणि मणिपूरमध्ये शांतता व सुरक्षितता कायम राखण्याच्या भारतीय लष्कराच्या बांधिलकीचे हे आणखी एक उदाहरण असल्याचे लष्कराने म्हटले आहे.

दरम्यान, मणिपूरमध्ये तीन शक्तिशाली आयईडी सापडल्याच्या घटनेनंतर अवघ्या २४ तासांत ही कारवाई करण्यात आली आहे. रविवारी गुप्तचर माहितीच्या आधारे स्पीअर कोअरच्या पथकाने मणिपूर पोलिसांच्या सहकार्याने जिरीबाम जिल्ह्यातील लिशाबिथोल आणि अहमदाबाददरम्यानच्या जंगल परिसरात तीन आयईडी शोधून काढले होते. या तिन्ही स्फोटकांचे एकूण वजन सुमारे २० किलो होते. या स्फोटकांना नियंत्रित पद्धतीने नष्ट करून घटनास्थळीच सुरक्षितपणे निकामी करण्यात आले. त्यामुळे मोठी जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान टळले.

हे ही वाचा:

ठाकरे गटाच्या विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द

चोरीच्या भीतीने चक्क क्रेनने एसयूव्ही घराच्या छतावर चढवली

सहारनपूरमध्ये पाडलेल्या मशिदीखाली २० फूट खोल विहीर

डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याची चमक फिकी; चांदीही घसरली

दरम्यान, विश्वसनीय गुप्तचर माहितीच्या आधारे मणिपूर पोलिस, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि मणिपूरमधील स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त पथकाने काकचिंग जिल्ह्यातील खेरगाव-नहारूप परिसरात अमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई केली. या कारवाईत दोन तस्करांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांची ओळख चंदेल जिल्ह्यातील ४८ वर्षीय मोहम्मद रियाज खान आणि २६ वर्षीय दंडशावा मोलोडी अशी झाली आहे. त्यांच्याकडून हेरॉइनने भरलेले साबणाचे १० डबे, एक होंडा अॅक्टिव्हा आणि एक फोर्ड फिगो कार जप्त करण्यात आली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा