29 C
Mumbai
Wednesday, September 16, 2026
घरराजकारणठाकरे गटाच्या विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द

ठाकरे गटाच्या विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द

सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी

Google News Follow

Related

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई महापालिकेत मोठा धक्का बसला असून ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे ओबीसी कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद अखेर रद्द करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या सभागृहात महापौर रितू तावडे यांनी यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने राऊत यांना नगरसेवकपद गमवावे लागले असून, पुढील सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढवण्यासही त्यांना बंदी घालण्यात आली आहे.

विशाखा राऊत यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत दादरमधील प्रभाग क्रमांक १९१ मधून ओबीसी महिला राखीव जागेवर निवडणूक लढवली होती. निवडणुकीसाठी त्यांनी पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे कुणबी जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र, जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर आणि क्षेत्राधिकारावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले. या निर्णयाविरोधात विशाखा राऊत यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यानंतर त्यांचे नगरसेवकपद रद्द होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. अखेर रविवारी महापौर रितू तावडे यांनी महापालिकेच्या सभागृहात त्यांच्या अपात्रतेची घोषणा केली.

हे ही वाचा:

चोरीच्या भीतीने चक्क क्रेनने एसयूव्ही घराच्या छतावर चढवली

सहारनपूरमध्ये पाडलेल्या मशिदीखाली २० फूट खोल विहीर

डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याची चमक फिकी; चांदीही घसरली

समाजशास्त्र-मानववंशशास्त्र क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक शोभिता जैन यांचे निधन

प्रभाग क्रमांक १९१ मधील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. विशाखा राऊत यांनी शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांचा अवघ्या १९७ मतांनी पराभव केला होता. राऊत यांना १३ हजार ३२६ मते मिळाली होती, तर प्रिया सरवणकर यांना १३ हजार ३९ मते मिळाली होती. प्रिया सरवणकर यांनीच राऊत यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर आक्षेप घेत संबंधित समितीकडे दाद मागितली होती. या तक्रारीनंतर झालेल्या तपासात प्रमाणपत्र अवैध असल्याचे निष्पन्न झाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा