30 C
Mumbai
Saturday, October 3, 2026
घरराजकारणपालघरमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण

पालघरमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण

गोविंदाच्या बिलावरून वाद

Google News Follow

Related

दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदाच्या उपचाराच्या बिलावरून पालघरमधील रिलीफ हॉस्पिटलमध्ये मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. उपचाराच्या खर्चावरून निर्माण झालेल्या वादानंतर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्याचा आरोप आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यात एका कर्मचाऱ्याला थप्पड मारण्यात आल्याचे दिसत आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहीहंडीच्या उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदा पथकातील सदस्याला उपचारासाठी रिलीफ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार आणि वैद्यकीय तपासण्यांनंतर रुग्णालयाकडून सुमारे १९ हजार ८६६ रुपयांचे बिल देण्यात आले. बिलाच्या रकमेवरून रुग्ण आणि रुग्णालय प्रशासनामध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शहरप्रमुख राहुल घरत यांच्यासह काही कार्यकर्ते रुग्णालयात पोहोचले. यावेळी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी जोरदार वाद झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
ओला-उबरच्या गिग वर्कर्सना सामाजिक सुरक्षेचे कवच

‘डीजे वाजणारच, बंद करून दाखवा’

विरोधकांकडून लक्ष्य ठरलेल्या ‘एसआयआर’मुळे ३५ वर्षांनी दोन भावांचे मिलन

दिल्लीत विद्यार्थ्यांचे वसतिगृह असलेली इमारत कोसळून २ मृत्युमुखी

रुग्णालय प्रशासनाच्या आरोपानुसार, कार्यकर्त्यांनी अतिदक्षता विभागात प्रवेश करून कर्मचाऱ्यांना धमकावले आणि एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. जखमी गोविंदाला उपचार सुरू असतानाच रुग्णालयातून बाहेर नेण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह महाराष्ट्र वैद्यकीय सेवा संरक्षण कायद्यान्वये १७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजसह उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा