29 C
Mumbai
Wednesday, October 7, 2026
घरविशेषविरोधकांकडून लक्ष्य ठरलेल्या 'एसआयआर'मुळे ३५ वर्षांनी दोन भावांचे मिलन

विरोधकांकडून लक्ष्य ठरलेल्या ‘एसआयआर’मुळे ३५ वर्षांनी दोन भावांचे मिलन

भावनिक क्षणांनी शाळेचे आवार गहिवरले

Google News Follow

Related

मतदार पडताळणीची नेहमीची प्रक्रिया सुरू असताना हरियाणातील जिंद जिल्ह्यात तब्बल ३५ वर्षांपासून विभक्त असलेल्या दोन भावांची अचानक भेट झाली. सरकारी शाळेत झालेल्या या भावनिक पुनर्भेटीत दोन्ही भावांनी एकमेकांना मिठी मारली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. हरियाणातील सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकनाच्या पडताळणीदरम्यान हा अनपेक्षित प्रसंग घडला. एरवी विरोधकांकडून एसआयआर प्रक्रियेवर टीका केली जाते, पण त्याच प्रक्रियेमुळे दोन भावांना एकत्र आणण्यात यश आले.

सीताराम हे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी शाळेत आले होते. त्यावेळी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी कृष्ण कुमार यांनी त्यांच्याकडून गाव, वडिलांचे नाव आणि भावाची माहिती विचारली. सीताराम यांनी आपल्या भावाचे नाव बलबीर असल्याचे सांगितले. त्यानंतर कृष्ण कुमार यांनी पडताळणीच्या प्रक्रियेत बलबीर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. दूरध्वनीवर सीताराम यांचे नाव ऐकताच बलबीर यांनी त्यांना लगेच ओळखले. “होय, ते माझेच भाऊ आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून मी त्यांचा शोध घेत होतो,” असे बलबीर यांनी सांगितले.यानंतर बलबीर तातडीने शाळेत पोहोचले.

हे ही वाचा:

मॅकडोनाल्ड्सच्या इंटर्नचा पगार थकला

ऑपरेशन सिंदूरनंतर EOS-05 ही गरज होती

पुण्यात हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

बापट बहू बडबडला!

आणि अश्रुंचा बांध फुटला!

दोन्ही भाऊ समोरासमोर येताच त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. अनेक वर्षांच्या विरहामुळे भावनांचा बांध फुटला आणि दोघांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हा भावनिक क्षण पाहून शाळेत उपस्थित असलेले अधिकारी आणि इतर लोकही हेलावून गेले. तब्बल तीन दशकांहून अधिक काळानंतर झालेली ही भेट उपस्थितांसाठीही अविस्मरणीय ठरली.

मतदार केंद्रस्तरीय अधिकारी कृष्ण कुमार यांनी सांगितले की, सीताराम यांच्या कुटुंबीयांनी अनेक वर्षे त्यांचा शोध घेतला होता. मात्र बराच काळ त्यांच्याबाबत कोणतीही माहिती न मिळाल्याने कुटुंबीयांनी अखेर ते मरण पावले असावेत, असे गृहीत धरले होते. सीताराम यांनी भावाचे नाव सांगितल्यानंतर पडताळणीला अनपेक्षित वळण मिळाले. कुटुंबीयांनी सीताराम यांच्या पायांमध्ये अडचण आहे का, अशीही विचारणा केली होती. त्यावरून त्यांची ओळख अधिक निश्चित करण्यात आली.

सीताराम यांचे धाकटे भाऊ बलबीर यांना माहिती मिळताच ते शाळेत आले आणि दोघांची अखेर भेट झाली. सीताराम गेल्या काही वर्षांपासून पंजाबमध्ये राहत होते. तेथे ते सरकारी नोकरी करत होते. त्यापूर्वी त्यांनी एका खासगी शाळेत शिपाई म्हणूनही काम केले होते. मनोहरपूर येथील सरकारी शाळेतून शाळा सोडल्याचे जुने प्रमाणपत्र घेण्यासाठी ते तब्बल ३५ वर्षांनंतर परतले होते. याच भेटीदरम्यान त्यांनी दिलेल्या कौटुंबिक माहितीतून त्यांच्या भावाशी संपर्क साधला गेला. सीताराम हे सहा भावंडांपैकी पाचवे भाऊ आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा