32 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
घरदेश दुनिया'क्वालिटी सिटी उपक्रमांत' देशात मिळाला नाशिकला पहिला मान

‘क्वालिटी सिटी उपक्रमांत’ देशात मिळाला नाशिकला पहिला मान

'क्वालिटी शहर' म्हणून देशातल्या पाच शहरांमधून पहिल्यांदा नाशिकचा विकास

Google News Follow

Related

कुशल भारत मोहिमेअंतर्गत ‘कौन्सिल ऑफ इंडिया’ आणि ‘राष्ट्रीय  कौशल्य विकास महामंडळ’ यांच्या मार्गदर्शनात नाशिकमधल्या संस्थांशी सामंजस्य करार केला जाणार आहे यात ‘क्वालिटी शहर’ म्हणून देशातल्या पाच शहरांमधून पहिल्यांदा नाशिकचा विकास केला जाणार आहे.

या उपक्रमात ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ आणि नाशिक महानगरपालिका , जिल्हा परिषद, क्रेडाई, नाशिक मेट्रो, श्री रामकृष्ण आरोग्य संस्था आणि नाशिक सिटीझन फोरम यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात येणार असून मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल , स्किल डेव्हलपमेंट कोर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेदमणी तिवारी, आणि संचालक जितूभाई ठक्कर क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जय शाह , यांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली.

स्वच्छ शहर सर्वेक्षण अंतर्गत नाशिकला पहिल्या क्रमांकावर आणण्याचा मानस आहे. ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ  इंडिया’ यासाठी मदत करणार आहे. या उपक्रमासाठी हिवरेबाजार मॉडेलचा अभ्यास केला जाणार आहे. याशिवाय नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्याकडून सर्व शाळा डिजिटल करण्याबरोबरच शाळेच्या पटसंख्येवर भर दिला जाणार आहे.  घरगुती कामगार , वाहन चालक ,पर्यवेक्षक स्तरावरील कर्मचारी , शिपाई यांच्या कौशल्य विकासाच्या पहिल्या टप्प्याच्या कार्यक्रम घेतला जाणार आहे.

क्वालिटी सिटी नाशिक चळवळ यांत्रिक हे त्या त्या क्षेत्रांमधली सध्याची परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रांतील अडथळे आणि संभाव्य आव्हाने ओळखून त्यांच्यावर मात करणारे आराखडे तयार केले जातील. कामगारांपासून चालक, शिपाई यांच्या गुणवत्तेसाठी प्रयन्त केले जाणार आहेत. याशिवाय  विचार असोसिएशन आणि निकम मानवी संसाधन प्रशिक्षणावर माध्यम स्तरीय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

हे ही वाचा:

जीएसटी संकलनात झाली इतकी वाढ

ही जगताप साहेबांनी केलेल्या कामाची पावती आहे’

हिंगोलीत अल्पवयीन मुलाने कुह्राडीने केली वडिलांची हत्या

राहुल गांधी आता तपस्वी नाहीत

पहिला टप्पा कोणासाठी?

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात नाशिक शहरातील वाहनचालक, घरगुती कामगार , शिपाई, पर्यवेक्षक स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. नाशिकमध्ये या चळवळीमुळे मनुष्यबळाचा दर्जा आणि गुणवत्ता प्रायोगिक तत्वावर विकासाला देण्यासाठी राबवली जाणार आहे. हि चळवळ योग्य दिशेने यशस्वी करून इतर शहरांमध्ये सुद्धा तिचे अनुकरण केले जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत देशातील पाच शहरांची निवड करण्यात आली असून पहिला मान हा नाशिक शहराला मिळाला आहे,  असे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले आहे. नाशिक जिल्ह्यात कौशल्य विकास . शिक्षण आणि स्वच्छता या क्षेत्राचा विकास घडवणे हे या चळवळीचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमासाठी महानगरपालिका, जिल्हा परिषद, आदिवासी विकास आणि विविध शासकीय विकास तसेच अन्य संस्थांचे सहकार्य लाभणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा