25 C
Mumbai
Saturday, March 25, 2023
घरराजकारणराहुल गांधी आता तपस्वी नाहीत

राहुल गांधी आता तपस्वी नाहीत

अखेर दाढी कापली

Google News Follow

Related

भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी त्यांच्या दाढीमुळे चर्चेत आले होते. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींची दाढी खूप वाढली होती . मात्र राहुल गांधींनी त्यांचा पूर्ण लुक आता बदलला आहे. जेव्हा राहुल गांधी यांनी यात्रा सुरु केली होती तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर दाढी नव्हती. मग ती वाढली.राहुल गांधी दाढीमध्ये वावरू लागल्यापासून त्यांना तपस्वी म्हणण्यासाठी चढाओढ सुरू झाली होती.  यात्रा संपेपर्यंत ते साधूसारखेच दिसायला लागले होते. आता राहुल गांधींचा तपस्वी चेहरा बदलला आहे.  पण राहुल गांधींचा नवीन फोटो आता समोर आला आहे त्यात त्यांनी आपली दाढी ट्रिम केली आहे. शिवाय आपल्या केसांचा कटसुद्धा बदलला आहे.

काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि कवी इम्रान प्रतापगडी यांनी ट्विटरवर राहुल गांधीचा एक फोटो शेअर केला आहे.  टी शर्ट आणि झब्बा यात वावरणारे राहुल गांधी केम्ब्रिजमध्ये सुटाबुटात वावरताना दिसत आहेत.  या फोटोत राहुल यांनी काळ्या रंगाचा सुटमधे दिसत असून त्यांनी आपल्या केसांचा  लूकसुद्धा  बदलला आहे. शिवाय आपली दाढी सुद्धा ट्रिम केली आहे. इम्रान यांनी ट्विटमध्ये ‘राहुलचा हा नवा लुक अप्रतिम आहे’ असे कॅप्शन पण दिले आहे.

सध्या काँग्रेस खासदार राहुल गांधी सात दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर गेले असून तिथे केम्ब्रिज विद्यापीठात व्याख्यान देणार आहेत. तिकडे असणाऱ्या भारतीयांना ते संबोधित करणार आहेत.  गेल्या वर्षी सात सप्टेंबरला कन्याकुमारी येथून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु झाली होती. त्यात त्यांनी चार हजार किलोमीटरचा प्रवास करून अनेक राज्यांचा प्रवास केला. काँग्रेसच्या या यात्रेत अनेक जणांनी सहभाग घेतला आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,880चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा