28 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरराजकारणसंजय राऊत यांनी महाराष्ट्रद्रोह केला आहे!

संजय राऊत यांनी महाराष्ट्रद्रोह केला आहे!

भाजपा आमदार आशीष शेलार यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

संजय राऊत हे आपल्या बेलगाम बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या अडीच ते तीन वर्षात त्यांनी वारंवार आपल्या अशा बेफाम बोलण्यातून अनेकांवर आरोप केले आहेत. अगदी शिव्यांची लाखोली वाहिल्याचेही दिसले आहे. आता त्याचा कडेलोट करताना त्यांनी विधिमंडळालाच चोर मंडळ म्हटल्याने राऊत यांनी पातळी ओलांडल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरावर व्यक्त होत आहे.

भाजपाचे आमदार आशीष शेलार यांनी यासंदर्भात कारवाईची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी हे विधान करून महाराष्ट्राशी द्रोह केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही संजय राऊत यांच्याविरोधातील कारवाईच्या मागणीचे समर्थन केले. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही राऊत यांच्या विधानाशी आपण सहमत नाही अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी संजय राऊत यांना समर्थन देताना दिसत नाही.

हे ही वाचा:

मुंबईतील सेलिब्रिटिजच्या घरी बॉम्बस्फोट झाल्याचा फोन

मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचे राजीनामे

असदुद्दीन ओवैसी यांच्या व्याह्याने केली आत्महत्या

१०० कोटींच्या कोविड घोटाळ्याप्रकरणी दोघांना अटक

आशीष शेलार म्हणाले की, विधिमंडळाच्या अपमानाबाबत रोखठोक भूमिका घ्यायला हवी. बोटचेपी भूमिका नको. अजित पवार म्हणाले की, कारवाई करा पण त्याआधी संजय राऊत नेमके काय म्हणाले याचीही पाहणी करा. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी मात्र संजय राऊत यांची बाजू घेतली. यासंदर्भात अजित पवार म्हणाले की, संजय राऊत यांच्या विधानात तथ्य आहे का ते तपासून घ्यायला हवे पण अशी व्यक्ती कोणत्याही पक्षाची असली तरी त्याला समज दिली पाहिजे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,877चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा