30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणन्यायालयाचा जसा अवमान होतो, तसाच हा विधिमंडळाचा अवमान !

न्यायालयाचा जसा अवमान होतो, तसाच हा विधिमंडळाचा अवमान !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली कणखर भूमिका

Google News Follow

Related

ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी विधिमंडळ नव्हे चोरमंडळ असे विधान व्यक्त केल्यानंतर त्याचे पडसाद विधिमंडळात उठले. त्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणखर भूमिका घेतली.

ते म्हणाले की, एकमताने आमच्या पक्षाचा असता तरी या विधिमंडळाने संकेत देणे गरजेचे आहे. अशाप्रकारे अपमान खपवून घेणार नाही. वाट्टेल ते झाले तरी खपवून घेणार नाही. काय निर्णय घ्यायचा तो घ्या. पण मी वैयक्तिक मनापसून नाराजी व्यक्त करतो. या वक्तव्याच्या निषेध करतो. अशा प्रकराचे विधान करणाऱ्यांवर सभागृह काय कारवाई करते हे लोक पाहणार आहे. जसे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केला की, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होते. न्यायालयाच्या विरोधात बोलू लागलो तर न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल. विधानमंडळाविरोधात कुणीही उठेल आणि काहीही बोलेल. त्यामुळे हे कंटेम्प्ट ऑफ विधानमंडळ आहे. याचं समर्थन होऊ शकत नाही. गाय मारली म्हणून वासरू मारू नये हेही योग्य नाही.

हे ही वाचा:

राहुल गांधी आता तपस्वी नाहीत

संजय राऊत यांनी महाराष्ट्रद्रोह केला आहे!

शेकापला फटका, धैर्यशील पाटील भाजपात दाखल

‘कोविड प्रकरणात जवळच्या माणसाला अटक केल्यामुळे संजय राऊत प्रचंड निराश’

संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे विधिमंडळ नव्हे चोरमंडळ आहे असे बेफाम वक्तव्य राऊत यांनी केले. त्यावरून दिवसभर राज्यात राऊत यांच्याविरोधात निषेधाचे सूर उमटत होते. त्यांच्यावर हक्कभंग आणला गेला. तशी सूचना आमदार अतुल भातखळकर यांनी दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्याचीही मागणी करण्यात आली. यादरम्यान राऊत हे कोल्हापुरात शिवगर्जना या त्यांच्या गटाच्या मोहिमेत सामील झालेले होते. आपण केवळ शिंदे व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या बाबत म्हटले असे उत्तर त्यांनी दिले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा