30 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरराजकारणशेकापला फटका, धैर्यशील पाटील भाजपात दाखल

शेकापला फटका, धैर्यशील पाटील भाजपात दाखल

देवेंद्र फडणवीस यांचे धैर्यशील पाटील यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात आश्वासन

Google News Follow

Related

‘भाजप पक्षात योग्य संधी मिळेल आणि परक्यासारखी वागणूक मिळणार नाही ‘असे आश्वासन उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि पेण मतदारसंघाचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना दिले. निमित्त होते धेर्यशील पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत आज भाजप पक्षांत प्रवेश केला आहे. मुंबईत भाजपच्या पक्ष कार्यालयात आज त्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. भाजप पक्ष महाराष्ट्रात आणखी बळकट होण्याच्या दिशेला आला आहे. यावेळेस फडणवीसांनी त्यांच्या पक्षाच्या लोकांचे पण कान टोचले.

भाजपात सगळ्यांना संधी मिळेल, कोणाचीही संधी डावलली जाणार नाही प्रत्येकाला त्याच्या ताकदीप्रमाणे संधी मिळणार आहेत. कुठेही नवा किंवा जुना वाद उद्भवणार नाही आपल्या सगळ्यांना मिळून एका दिशेने पुढे जायचे आहे. त्या दृष्टीनेच काम करू या यावेळेस पाटील यांच्याबरोबर आलेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो असेही ते पुढे म्हणाले. पक्ष बदलला तरी तुम्ही विचार बदलत नाही कारण आम्हाला पण वंचित घटकांसाठी काम करायचे आहे. कुठल्या पण परिस्थितीत जे आले आहेत त्यांना परके वाटणार नाही याची काळजी घेण्यात येईल असे मी आश्वासन देतो आपल्याला एक कुटुंब म्हणूनच काम करायचे आहे.आता नव्या जुन्याचा वाद करायचा नाही. आजपासुन एक नवा अध्याय आपण सुरु केला आहे. असेही फडणवीस पुढे म्हणाले.

२०१४ साली मी धैर्यशील यांना पक्षात आणण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा यश आले नाही. आज त्यांचा पक्ष प्रवेश झाला याचा मला अतिशय आनंद आहे. त्यांनी सामान्य माणसाकरिता काम केले आहे विरोधी पक्षात असताना त्यांनी आपले प्रश्न धडाडीने मांडले आहेत. मी मुख्यमंत्री असताना सुद्धा ते माझ्याकडे प्रश्न घेऊन यायचे आणि मी ते प्रश्न सोडवायचो अशा धडाडीच्या कार्याकार्ट्याचे नेतृत्व आपल्याकडे असले पाहिजे असे मला वाटत होते असेही देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले.

हे ही वाचा:

वकील प्रवीण चव्हाण गजाआड… कालिया, सांबा अडकले, गब्बर सिंगला अटक कधी?

व्हीप जारी झाला,ठाकरे गटाकडून सगळंच निसटतंय ?

संशयास्पद व्यक्तीवर लक्ष ठेवा!! NIAने केले मुंबई पोलिसांना सतर्क

भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांना धमकावू कसे शकतात?

धैर्यशील पाटील काय म्हणाले?

भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय मी घेतला आहे.  ज्या प्रकारे शेकापमध्ये काम केले त्याच पद्धतीने इथे सुद्धा काम करण्यात येणार आहे. शेकाप मध्ये  काही कमी पडले म्हणून हा निर्णय घेण्यात नाही आला. तर कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी , त्या कामाला अजून धार येण्यासाठी आणि राष्ट्रीय पातळीवर कष्टकऱ्यांचे म्हणणे मांडता यावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत आहोत असे धैर्यशील पाटील यावेळेस म्हणाले.

पुढे आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, आपण कुठेही मागे पडू नये म्हणून आपल्याला भाजपमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. आपण निष्ठेने काम करणारी माणसे आहोत. ९० टक्के आपल्याला यश मिळेल तुमची जबाबदारी मी स्वीकारेन. तुमचे सामाजिक आणि राजकीय अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी मी या पक्षातील नेत्यांकडून घेतली असे ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,877चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा