33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरसंपादकीयवकील प्रवीण चव्हाण गजाआड… कालिया, सांबा अडकले, गब्बर सिंगला अटक कधी?

वकील प्रवीण चव्हाण गजाआड… कालिया, सांबा अडकले, गब्बर सिंगला अटक कधी?

एपीआय सचिन वाझे आणि विशेष सरकारी वकील प्रवीण पंडीत चव्हाण ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत

Google News Follow

Related

दुसऱ्या साठी कबर खणणारा अखेर स्वत:च त्या खड्ड्यात पडतो, असे म्हणतात. परंतु हे फक्त मोहऱ्यांबद्दल होताना दिसते, सूत्रधार मात्र मोकाटच राहतात. भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यासाठी लावलेल्या सापळ्यात माजी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण स्वत: अडकले.

चाळीसगाव येथे पोलिसांनी त्यांना काल रविवारी अटक केली. निलेश भोईटे यांच्या घरी टाकण्यात आलेल्या धाडीची बनावट पटकथा साहेबांच्या आदेशावरून चव्हाण यांनीच रचली होती. महाविकास आघाडी सरकार असताना विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची चलती होती. सरकारात बसलेल्यांनी आखलेल्या कारस्थानांची अंमलबजावणी करण्याचे काम ते करत होते. या कटांची पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन या तिन्ही भूमिका एक हाती पार पाडत होते. परंतु शेरास सव्वाशेर मिळाला आणि त्यांच्याच कार्यालयातून होणाऱ्या या गोरखधंद्यांचा पर्दाफाश झाला.

महाविकास आघाडीसाठी ते करत असलेले कारनामे प्रकाशात आले आणि चव्हाण यांचे दिवस फिरले. त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. ज्यांच्यासाठी चव्हाण कटांची अमंलबजावणी करत होते, ते नामानिराळे राहीले, पण चव्हाणांच्या भोवती एकेक फास आवळत गेला. एक कोटीच्या खंडणी प्रकरणी चव्हाण आरोपी आहेत. परंतु या प्रकरणात न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. परंतु दुसऱ्या एका प्रकरणात चाळीसगाव येथे पोलिस त्यांना अटक करण्यात आली. हे तेच प्रकरण आहे, ज्यात गिरीश महाजन यांना अटकवण्याचा प्रयत्न झाला. ज्याप्रकरणात २०२१ मध्ये पुण्यात पुन्हा दाखल झाला होता. कोथरुड पोलिस याचा तपास करीत होते..

हे ही वाचा:

केरळच्या मंदिरात आता झुलणार रोबोटिक हत्ती

‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा’ म्हणून मोदींना भेटणार

६० वर्षांनंतर ‘नोकिया’ने रंगरूप बदलले…

‘काँग्रेस राजवटीत एअर इंडियाची घोटाळ्यांसाठी होती ओळख’

 

पुण्यातील मराठा विद्या प्रसारक मंडळ ही एक सधन शैक्षणिक संस्था या संस्थेतील गटातटांचा वापर करून एक कट रचण्यात आला. गिरीश महाजनांना या प्रकरणात गोवून त्यांना मोक्का अंतर्गत अटक करायची अशी योजना होती.
मविमंमध्ये पाटील विरुद्ध भोईटे गट आहे. यापैकी विजय पाटील यांच्या अपहरण प्रकरणी गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. महाजन यांचे स्वीय सचिव रामेश्वर याने हे अपहरण केले. फोनवरून त्याने पाटील आणि महाजन यांचे बोलणे करून दिले. त्यात महाजन यांनी संस्था आमच्या ताब्यात द्या, असे एफआयआरमध्ये म्हटले होते.

याच प्रकरणात निलेश भोईटे यांच्या घरी धाड टाकण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारनेच हा कट शिजवला होता, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. मविआचे काही मंत्री, भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे, पोलिस या कटात सामील होते. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनीच या संपूर्ण प्रकरणाची पटकथा लिहिली होती.

भोईटे यांच्याकडे धाड कशी टाकायची, तिथे रक्त लागलेला चाकू कसा प्लांट करायचा, तिथे ड्रग्ज सापडल्याचे दाखवायचे, माफीचा साक्षीदार कोण होणार, जबान्या कशा द्यायच्या हा सगळा तपशील चव्हाण याने रचला होता. इतकंच काय एफआयआरही त्यानेच लिहिला होता.

हे सगळ इतकं व्यवस्थित जमवण्यात आलं होते की, महाजन त्यात अडकून मोक्काअंतर्गत तुरुंगातच गेले असते. परंतु त्यांचे नशीब बलवत्तर. तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हाती या बनावाचे व्हीडीयो रेकॉर्डींग लागले. थोडे थोडके नव्हे १२५ तासांचे. फडणवीसांच्या शब्दात सांगायचे झाले तर यातून किमान २५ ते ३० वेबसिरीज बनल्या असत्या.
फडणवीसांनी या रेकॉर्डींगचा पेन ड्राईव्ह तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे सादर केला होता.
यात रेकॉर्डींगमध्ये अनेकांची नावे होती. प्रवीण चव्हाण याच्या संवादातून समोर आलेला तपशील धक्कादायक होता. या कटाचा आवाका स्पष्ट करणारा होता.

साहेबांनी डीजीना सांगितले, किती मिटींग झाल्या? सीपीना रात्रभर बसवून ठेवले होते. साहेब यशवंतराव सेंटरला होते, त्यांनी डीजींना सांगितले. आम्ही गाडीत बसलो मग सीपींचे एका मागून एक फोन येऊ लागले. अजित पवार सपोर्ट करीत नाहीत, परंतु मोठे साहेब पूर्ण लक्ष ठेवून आहेत. अनिल देशमुख असते तर बरं झालं असतं, ते सांगूनच ठेवायचे प्रवीण चव्हाण आले तर त्यांना एण्टी चेंबरमध्ये बसंव. त्यांच माझ्या शिवाय पान हलत नव्हतं.

प्रवीण चव्हाण यांचे एक अशील तेजस मोरे यांनी याप्रकरणी चव्हाण यांच्याविरोधात साक्ष दिली. ज्या घडाळ्यात लावलेल्या छुप्या कॅमेरातून हे व्हीडीयो रेकॉर्डीग झाले ते घड्याळ तेजस मोरे यांनीच दिल्याचा आरोप आहे, परंतु मोरे यांनी हा आरोप फेटाळला आहे. विधानसभेतील ज्या भाषणात फडणवीसांनी हा कट उघड केला, प्रवीण चव्हाण यांच्यावर आरोप केले. सरकारचे कारस्थान उघड केले. त्याच कटात महाजन हे फक्त मोहरे होते. हा फडणवीसांना गोवण्याचा डाव होता.

माझ्यासह अनेक भाजपा नेत्यांना गोवण्याचा हा डाव होता असे फडणवीस यांनीच या भाषणात सांगितले आहे.
हे सगळं प्रकरण विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यलयात फक्त मार्गी लावलं जात असलं तरी या कटाचे केंद्र हे यशवंतराव चव्हाण सेंटर हेच होते. डीजींना कोण फोन करत होते? सीपींना कोण आदेश देत होते? अजित पवार सपोर्ट करत नाहीत, पण मोठे साहेब लक्ष ठेवून आहेत! ही सगळी वाक्य बोलकी आणि स्वयंस्पष्ट आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही या कटात सहभाग होता हे उघडच आहे.

फडणवीसांची राजकीय कारकीर्द संपवून त्यांना आयुष्यातून उठवण्याचा हा कट होता. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत फडणवीसांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. सरकारमध्ये सामील असलेल्या मंत्र्यांच्या आदेशावरून त्यांना हवी ती कामे वाजवणारा एपीआय सचिन वाझे आणि विशेष सरकारी वकील प्रवीण पंडीत चव्हाण ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे दोघे आज तुरुंगात आहेत. परंतु यांनी तर फक्त दिलेले आदेश पाळले. हुकूमाची अंमलबजावणी केली, परंतु ज्यांनी हे बेकायदा आदेश दिले त्यांचे काय? त्यांच्या कॉलरला हात घातला जाणार काय? हा कळीचा मुद्दा आहे. चव्हाण आत जाऊन जर साहेब नामानिराळे राहात असतील तर ही कारवाई अधुरीच आहे आणि म्हणून निरर्थक आहे, असे म्हणावे लागेल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा