26 C
Mumbai
Sunday, March 26, 2023
घरविशेषआज 'रामन इफेक्ट'चा दिवस, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

आज ‘रामन इफेक्ट’चा दिवस, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

आज २८ फेब्रुवारीला ' राष्ट्रीय विज्ञान दिवस' आपल्याकडे 'सी. व्ही. रामन' यांच्या 'रामन इफेक्ट' साठी ओळखला जातो

Google News Follow

Related

विज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे माणसाचे जीवन सोपे झाले आहे. विज्ञान हे एक साधन नसून ती आता गरज बनली आहे. विज्ञानाचा वाढता प्रभाव अधिक समृद्ध करण्यासाठी दरवर्षी ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिन २०२३ ची संकल्पना हि ‘ग्लोबल सायंन्स फॉर ग्लोबल वेलफेअर’ अशी आहे.  दरवर्षी आपल्याकडे २८ फेब्रुवारी हा दिवस ‘रामन इफेक्ट’च्या शॊधा साठी म्हणून सी व्ही रामन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जातो. २८ फेब्रुवारी १९८६ या दिवसापासून ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून ठरविण्यात आला आहे. कारण यादिवशी सर सी. व्ही. रामन यांनी याच दिवशी १९२८ साली ‘रामन इफेक्ट’ चा  शोध लावल्याची घोषणा केली होती आणि यासाठीच त्यांना १९३० साली  भौतिकशास्त्रातील  पहिले नोबल पारितोषिक देण्यात आले होते.

या निमित्ताने देशभरात वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित विज्ञान संवाद उपक्रमांचे आयोजन केले जाते. म्हणूनच देशभरात २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा करतात.  दैनंदिन जीवनामध्ये सामान्य लोकांना विज्ञानाचेमहत्व कळण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. संपूर्ण भारतात शाळा, महाविद्यालयांमध्ये आणि अनेक संस्थांमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करतात. या दिवसाच्या निमित्ताने विज्ञानाची आवड असणाऱ्या नागरिकांना विविध उपक्रम राबवून प्रोत्साहनपर अनेकते उपक्रम राबविले जातात.

हे ही वाचा:

मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक

‘भगूर’ १५ दिवसात होणार पर्यटन स्थळ

काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग, आणखी एक काश्मिरी पंडिताची हत्या

अजितदादा, ही पोटदुखी कशामुळे? शिंदे-फडणवीसांनी विचारला सवाल

कोण आहेत सी व्ही रामन ?

सी व्ही रामन यांचा जन्म मद्रास मधील त्रिची जे आत्ताचे तिरुचिरापल्ली इथे झाला. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी पदवी मिळविली. पुढच्या शिक्षणासाठो त्यांनी कलकत्ता इथे नोकरी केली नोकरी करताकरता इंडियन असोसिएशन फॉर द चुलतीवशन ऑफ सायन्स इथे संशोधनाचे काम सुरु ठेवले. थोड्या वर्षातच त्यांची ख्याती जगभरात पसरली एकदा काही कामासाठी ते इंग्लंडला गेले होते या प्रवासादरम्यान त्यांना आकाश आणि समुद्र हे निळ्या रंगाचे च का असतात हा प्रश्न त्यांना पडला. भारतात परत आल्यावर त्यांनी यावर संशोधन सुरु केले. आणि म्हणूनच जगासमोर रामन इफेक्ट जगासमोर आला. त्यांचा हा शोध २८ फेब्रुवारी १९ २८ साली जगासमोर येऊन १९३० साली त्यांना ‘नोबल पारितोषिक’  मिळाले तोच गौरव दिन म्हणून आपण २८ फेब्रुवारी हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा करतो

काय आहे  रामन इफेक्ट ?

सूर्याची किरणे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना ती विखुरली जातात. वातावरणातील  थर  आणि त्यातले वायू कण यांच्यामुळे त्यांचे विभाजन होते. या किरणांमुळे तयार होणाऱ्या रंगांमधे निळ्या रंगांचा समावेश असतो. निळ्या रंगांची किरणे लहान लहरींमार्फत वातावरणामध्ये पुढे जातात. त्यामुळे निळा रंग इतर रंगांपेक्षा जास्त पसरला जातो. परिणामी आपल्याला आभाळ निळ्या रंगाचे दिसते हे सर्व कसे घडते यावरच सी. व्ही. रमण यांनी अभ्यास केला आणि त्यातूनच ‘रामन एफ्फेक्ट’चा शोध लागला. याच सिद्धांतामुळे आकाशप्रमाणेच समुद्रसुद्धा निळ्या रंगाचा दिसतो आजच्या ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’च्या निमित्ताने त्यांना शतशः नमन.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,880चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा