28 C
Mumbai
Friday, June 24, 2022
घरदेश दुनियाडंका वाजतोय! ‘न्यूज डंका’ला देवर्षी नारद पुरस्कार!

डंका वाजतोय! ‘न्यूज डंका’ला देवर्षी नारद पुरस्कार!

Related

विश्व संवाद केंद्राच्या पुरस्काराचे राज्यपालांच्या हस्ते होणार वितरण

‘राष्ट्रवादाचा बुलंद आवाज’ या घोषवाक्यासह माध्यम क्षेत्रात समर्थपणे वाटचाल करणाऱ्या ‘न्यूज डंका’ या वेबपोर्टलच्या कामगिरीचा गौरव यंदाच्या ‘देवर्षी नारद’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने करण्यात आला आहे. ‘न्यूज डंका’चे मुख्य संपादक दिनेश कानजी हा पुरस्कार राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते बुधवार, १८ मे रोजी स्वीकारणार आहेत.

विश्व संवाद केंद्र मुंबईच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना गेली २२ वर्षे ‘देवर्षी नारद’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावेळी ‘दर्जेदार वृत्तसंकेतस्थळ’ ‘न्यूज डंका’ला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

१२ जानेवारी २०२१ रोजी स्वामी विवेकानंद जयंतीचे निमित्त साधून ‘न्यूज डंका’चा शुभारंभ झाला होता. याच ‘न्यूज डंका’ने मीडियाच्या वर्तुळात आणि वाचकांमध्ये एका वर्षात चर्चा होईल एवढे यश मिळवले आहे. या यशामुळे ‘न्यूज डंका’ला विश्व संवाद केंद्रातर्फे दिला जाणारा यंदाचा दर्जेदार वृत्तसंकेतस्थळाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार राजभवनात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांच्या हस्ते बुधवार, १८ मे रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत प्रदान करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

‘खोटी नियत, कद्रु दानत हीच या खंडणीखोर सरकारची ओळख’

‘अपयशी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव’

चंद्रावरची माती त्यात उगवली रोपटी

अमृता फडणवीस म्हणाल्या, वजनदार ने हलके को…

 

‘न्यूज डंका’च्या टोकदार बातम्या, परखड विश्लेषण असलेले लेख आणि ‘न्यूज डंका’च्या युट्युब चॅनेलवरील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. राजकीय विश्लेषणासोबत क्राईमच्या व्हिडिओनादेखील लोकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वांच्या न्यूज डंकाने घेतलेल्या मुलाखतीही गाजत आहेत. फिल्म, व्यापार, आंतरराष्ट्रीय बातम्या यावरील व्हीडिओंनाही लोक पसंती देत आहेत. मराठीसोबत ‘हिंदी न्यूज डंका’चाही बोलबाला माध्यम क्षेत्रात आहे. त्यावरील व्हीडिओ, बातम्या यांनाही पसंतीची पोचपावती मिळाली आहे.

मुख्य संपादक दिनेश कानजी, कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व उद्योगपती प्रशांत कारुळकर, भाजपा नेते तसेच ‘न्यूज डंका’चे सल्लागार संपादक आमदार अतुल भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘न्यूज डंका’च्या टीमने हे यश संपादन केले आहे.

२०२२ साठी ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, दिनेश गुणे, मृणालिनी नानिवडेकर व वैजयंती आपटे याच्या निवड समितीने विविध पत्रकारांच्या कामगिरीचा विचार करून एकूण सात श्रेणीमध्ये पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,936चाहतेआवड दर्शवा
1,920अनुयायीअनुकरण करा
10,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा