34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरदेश दुनियाबॅडमिंटनमध्येही 'अच्छे दिन'

बॅडमिंटनमध्येही ‘अच्छे दिन’

Google News Follow

Related

बॅटमिंटन खेळाची एक भव्य स्पर्धा असणाऱ्या थॉमस कप स्पर्धेत भारताला आजवर विजय मिळवणं तर दूरचं पण अंतिम सामन्यातही पोहोचता आलं नव्हतं. पण यंदाच्या वर्षी हे चित्र पालटलं आणि या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचत या चषकावर भारतीय संघानं ७३ वर्षांनी आपलं नावं कोरलं.

थॉमस कपची सुरुवात ही इंग्लंडच्याच एका खेळाडूने केली. १९ व्या दशकाच्या सुरुवातीला इंग्लंडचे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सर जॉर्ज एलन थॉमस यांनी या स्पर्धेची सुरुवात केली. फुटबॉल विश्वचषक स्पर्धा जशी होत होती, तशीच भव्य स्पर्धा बॅडमिंटनची देखील व्हावी असं थॉमस यांना वाटलं आणि या स्पर्धेची सुरुवात झाली. १९४८- १९४९ मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळवली गेली. जशी ऑलिम्पिक स्पर्धा दर चार वर्षांनी खेळवली जाते तशी थॉमस कप ही स्पर्धा आधी दर तीन वर्षांनी व्हायची मात्र, नंतर दर दोन वर्षांनी ही स्पर्धा होऊ लागली.

थॉमस कप या स्पर्धेत बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन म्हणजेच BWF या अधिकृत बॅडमिंटन फेडरेशनमध्ये असलेले सगळेच देश सहभाग घेत असतात. या स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी आशियाई देश मलेशियाने डेन्मार्कला अंतिम सामन्यात धुळ चारत कप मिळवला होता. त्यानंतर काही वर्षे ही स्पर्धा आशियामधल्या देशांमध्ये होऊ लागली. पहिली तीन वर्षे मलेशियाने लागोपाठ ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर मात्र या स्पर्धेत इंडोनेशियाने आपलं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आणि तब्बल १४ वेळा कप जिंकत सर्वाधिक थॉमस कप जिंकलेला देश म्हणून मान मिळवला. त्यानंतर चीनने हा कप १० वेळा जिंकलाय. तर पहिल्यांदा कप जिंकणाऱ्या मलेशियाने पाच वेळा या थॉमस कपवर आपलं नाव कोरलंय. थॉमस कप स्पर्धा सुरू झाल्याचे वर्ष १९४९ ते २०१२ पर्यंत या स्पर्धेवर चीन, मलेशिया आणि इंडोनेशिया याच देशांच्या संघाचं वर्चस्व राहिलेलं पाहायला मिळालं. त्यानंतर २०१४ मध्ये जपानने तर २०१६ मध्ये डेन्मार्कने ही स्पर्धा जिंकली. त्यातही विशेष म्हणजे डेन्मार्क हा ही स्पर्धा जिंकणारा एकमेव असा देश आहे जो आशिया खंडातला नाहीये.

२०२२ साली या विजयी संघांच्या यादीत अजून एक नाव समाविष्ट झालं आणि ते म्हणजे भारत. आतापर्यंत फक्त सहा देशांनी या थॉमस कपवर आपलं नाव कोरलंय. यंदा भारतीय बॅडमिंटन संघाने या स्पर्धेत सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी सुरु ठेवली होती आणि अंतिम सामन्यात भारतीय संघाने १४ वेळा थॉमस कप विजेतेपद पटकावलेल्या इंडोनेशियन संघाचा पराभव केला. हा विजय मिळवताच केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी भारतीय संघाला एक कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आले आणि भारतात क्रीडा क्षेत्राला मोठं महत्त्व प्राप्त झाल्याचं चित्र आहे. भारतात फक्त क्रिकेट आणि फुटबॉलची चर्चा करणारे लोक आता वेगवेगळ्या खेळांची चर्चा करू लागलेत. वेळातवेळ काढून इतर खेळांच्या स्पर्धा पाहू लागलेत. सर्वच खेळाडूंचं कौतुक करू लागलेत. लोक खेळाडूंची दखल घेऊ लागलेत. जिंकलेल्या खेळाडूंचं मन भरून कौतुक आणि अपयश मिळवलेल्या खेळाडूंची अगदी मनापासून समजूत घालायची, त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायच्या हे नरेंद्र मोदी अगदी नित्यनेमाने करत असतात. स्वतः दखल घेत असतात. याची प्रचिती ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये आलीच आहे. पदक मिळवलेल्या प्रत्येक खेळाडूशी नरेंद्र मोदींनी स्वतः संवाद साधला. त्यांचं कौतुक केलं. अपयशी झालेल्या खेळाडूंची समजूत काढली. नरेंद्र मोदींच्या या भूमिकेचं कौतुक अगदी विदेशी खेळाडूंनीही केलं. पॅरालिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंनी सांगितलं होतं की, परदेशी खेळाडू आम्हाला विचारायचे की, तुमचे पंतप्रधान तुमच्याशी एवढे आपुलकीने बोलतात त्याचं आम्हाला कौतुक वाटतं. स्पर्धेनंतरही नरेंद्र मोदींनी खेळाडूंची विशेष भेट घेऊन त्यांचं कौतुक केलं होतं. भारतासाठी सुवर्ण ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला मोदींनी स्पर्धेनंतर चुरमा खायला दिला होता. त्यानंतर पदक घेऊन परत याल, तेव्हा आईस्क्रीम खायला देईन, असं वचन बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला नरेंद्र मोदींनी दिलं होतं. नरेंद्र मोदींनी सिंधूला दिलेलं वचनही पूर्ण केलं आणि तिच्यासोबत आईस्क्रीम खाण्याचा आनंदही लुटला.

हे ही वाचा:

…. असे आहे पंतप्रधान मोदींचे भगवान बुद्धांशी नाते

अमृता फडणवीस म्हणाल्या, वजनदार ने हलके को…

दहशतवादी संघटनेकडून काश्मिरी पंडितांना धमकीचे पत्र

फडणवीसांनी ठोकले!

भारताला ४१ वर्षानंतर हॉकीमध्ये पदक मिळालं. या खेळाडूंनाही पंतप्रधान मोदींनी त्यांची ऑटोग्राफ असणारी हॉकी स्टिक भेट म्हणून दिली होती. महिला संघाचं हॉकीमधलं पदक थोडक्यात हुकलं तेव्हा खचलेल्या या महिला खेळाडूंना नरेंद्र मोदींनी पुढच्या स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्याचा सल्ला दिला, त्यांच्या मनात विश्वास निर्माण केला. थॉमस कप जिंकणाऱ्या खेळाडूंशी नरेंद्र मोदींनी संवाद साधला. अगदी प्रत्येक खेळाडूशी त्यांनी संवाद साधला. त्यांना त्यांचा अनुभव विचारला. त्यानंतर त्याचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं अभिनंदनही केलं. देशाच्या पंतप्रधानांच्या या विशेष प्रयत्नांमुळे खेळाडूंनाही नवीन चैतन्य मिळतं, प्रोत्साहन मिळतं, आपले पंतप्रधान आपल्याला नावाने ओळखतात याचं त्यांना कौतुक वाटतं  आणि ते नवं यश साध्य करायला पुन्हा जोशात, उत्साहात मैदानात उतरतात. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात क्रीडा क्षेत्राला नक्कीच अच्छे दिन आलेत असं आपण म्हणून शकतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा