29 C
Mumbai
Thursday, August 20, 2026
घरदेश दुनियायुएईमधील हॉटेलमध्ये पाकिस्तान्यांना ‘नो एंट्री’? भारतीय-अमेरिकन पासपोर्टला परवानगी

युएईमधील हॉटेलमध्ये पाकिस्तान्यांना ‘नो एंट्री’? भारतीय-अमेरिकन पासपोर्टला परवानगी

पाकिस्तानी नेत्याचा दावा

Google News Follow

Related

संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाकिस्तानी नागरिकांशी कथित भेदभावाचा मुद्दा पाकिस्तानच्या संसदेत गाजला आहे. पाकिस्तानचे माजी नॅशनल असेंब्ली अध्यक्ष आणि पीटीआय नेते असद कैसर यांनी यूएईमधील एका हॉटेलमध्ये पाकिस्तानी प्रवाशांना कथितपणे निवास नाकारल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, भारतीय आणि अमेरिकन पासपोर्टधारकांना मात्र हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली, असा दावा कैसर यांनी केला.

कैसर यांनी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये हा मुद्दा उपस्थित करत सरकारने राजनैतिक पातळीवर हा विषय यूएईसमोर मांडण्याची मागणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, यूएईमधील प्रवासादरम्यान त्यांची फ्लाइट रद्द झाली होती. त्यानंतर प्रवाशांनी हॉटेलमध्ये राहण्यासाठी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी फक्त भारतीय आणि अमेरिकन पासपोर्टधारकांना हॉटेलमध्ये निवास दिला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली, असा दावा त्यांनी केला.

असद कैसर यांनी हा प्रकार स्वतः अनुभवला असल्याचे सांगितले. फ्लाइट रद्द झाल्यानंतर हॉटेलमध्ये राहण्याची गरज निर्माण झाली असताना पाकिस्तानी प्रवाशांशी योग्य वर्तन करण्यात आले नसल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकाराबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे निषेध नोंदवल्याचेही सांगितले. कैसर यांनी हा मुद्दा केवळ वैयक्तिक अनुभवापुरता मर्यादित नसल्याचे सांगितले. इतर पाकिस्तानी नागरिकांचे एक शिष्टमंडळही अशाच प्रकारच्या तक्रारी घेऊन आपल्याकडे आले होते, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेऊन यूएईच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली.

हे ही वाचा:

अमेरिकेवर कर्जाचा डोंगर! इतिहासात प्रथमच कर्ज ४० ट्रिलियन डॉलरपार

होर्मुझमधून तेल नेण्यासाठी अमेरिकेने उघडला ‘गुप्त मार्ग’?

पाकला ‘जशास तसं’ दणका; उच्चायोगाबाहेरील बॅरिकेड्स हटवले

दिपके..आंदोलन असं करायचं असतं!

यूएईला पाकिस्तानचा जवळचा आणि मैत्रीपूर्ण देश संबोधत कैसर यांनी या कथित घटनेचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होऊ नये, असे म्हटले. यूएईच्या विकासात पाकिस्तानी नागरिकांचे मोठे योगदान असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. त्यामुळे अशा घटनांबाबत राजनैतिक माध्यमातून योग्य तो तोडगा काढण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा