28.5 C
Mumbai
Monday, June 29, 2026
घरदेश दुनियाअज्ञात क्षेपणास्त्राने तेलवाहू टँकरला लक्ष्य; तीन दिवसांतील दुसरी घटना

अज्ञात क्षेपणास्त्राने तेलवाहू टँकरला लक्ष्य; तीन दिवसांतील दुसरी घटना

सागरी सुरक्षेबाबत चिंता वाढली

Google News Follow

Related

जागतिक तेलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा एकदा सुरक्षा धोक्यात आल्याचे समोर आले आहे. अज्ञात क्षेपणास्त्राने एका तेलवाहू टँकरला लक्ष्य केल्याची माहिती ब्रिटनच्या युनायटेड किंगडम मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) या सागरी सुरक्षा संस्थेने दिली आहे. या हल्ल्यात टँकरच्या ब्रिजचे नुकसान झाले असले, तरी सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.

यूकेएमटीओच्या माहितीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना टँकरला अज्ञात क्षेपणास्त्राचा फटका बसला. घटनेनंतर जहाजाच्या कॅप्टनने तातडीने सागरी सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार, जहाजाला किरकोळ नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच समुद्रात तेलगळती किंवा पर्यावरणीय हानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांनी तपास सुरू केला असून परिसरातील जहाजांना अत्यंत सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्व व्यापारी जहाजांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वाधिक संवेदनशील सागरी मार्गांपैकी एक मानली जाते. जागतिक स्तरावरील मोठ्या प्रमाणातील कच्च्या तेलाची निर्यात याच मार्गातून होत असल्याने येथे घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आंतरराष्ट्रीय तेलबाजारावर परिणाम होतो. त्यामुळे या ताज्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा जागतिक ऊर्जा सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

११ वर्षांनंतर सेशेल्स दौरा, पंतप्रधान मोदी दाखल

“खरे काश्मिरी नाहीत” वक्तव्यावरून पीओके पंतप्रधान पाकिस्तानवर उखडले

टीईटी परीक्षेचा पेपर फुटला; शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली

“पत्रकारितेचे स्वातंत्र्य म्हणजे नागरिकांना छळण्याचा परवाना नाही”

गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या भागात सागरी सुरक्षेचा धोका कायम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ताज्या घटनेनंतरही आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा संस्थांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून पुढील काही दिवस हा मार्ग वापरणाऱ्या जहाजांसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाय लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा