31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरदेश दुनियापाकिस्तानला तालिबान प्रेमाची उचकी

पाकिस्तानला तालिबान प्रेमाची उचकी

Google News Follow

Related

अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबानने सत्ता काबिज केली आहे. अजूनही तालिबानच्या सत्तेला जगाने मान्यता दिलेली नाही. परंतु पाकिस्तानकडून मात्र तालिबानबद्दल सातत्याने कौतुक केले गेलेले पहायला मिळत आहे.

तालिबानींसाठी असलेले पाकिस्तानचे प्रेम पुन्हा एकदा उफाळून आले आहे. अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या गोंधळाच्या परिस्थितीत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले आहेत की, आधीचं अफगाण सरकार तालिबानची बदनामी करत होते. आता ते खोटं ठरलं आहे. कारण तालिबानींनी सरकारी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक माफी जाहीर केली आहे. तसंच मुलींना शिक्षणापासून दूर ठेवलं जाणार नाही अशी घोषणा देखील केली आहे.

हे ही वाचा:

एसटीच्या पेन्शनची वाट पाहता पाहता त्यांनी गमावले प्राण

बूस्टर डोसबद्दल डब्ल्यूएचओने केले ‘हे’ महत्वाचे वक्तव्य

कास पठार पर्यटकांसाठी खुले! पण केव्हापासून??

मास्क असेल तरच पुष्पगुच्छ घेणार

डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री कुरैशी यांनी सांगितलं की, ‘पाकिस्तानविरोधात खोटा ट्रेंड सुरु झाला पण तो अयशस्वी ठरला. जगाला माहिती आहे की अफगाणिस्तानमध्ये भ्रष्टाचारी व्यवस्था होती. सध्या जग अफगाणिस्तान प्रकरण सोडवण्यासाठी पाकिस्तानला एक जबाबादर देश समजून संपर्क करत आहे. आम्हाला अफगाणिस्तानात अशी व्यवस्था हवी आहे जी जगाला मान्य असेल.’

त्याबरोबरच कुरैशी यांनी माध्यमांशी बोलातना म्हटलं की,”तालिबान मुलींच्या शिक्षणावर बंदी घालेल अशी भीती होती पण असं झालं नाही. तालिबानने सार्वजनिकरित्या माफी जाहीर केली आहे. त्यांनी शाळा आणि व्यवसाय उघडणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच कोणत्याही प्रकारे सूड घेणार नाही आणि आतापर्यंत जे काही केलं आहे ते शांततेनं केलं असून त्याचं स्वागत करायला हवं.”

पाकिस्तानने नेहमीच तालिबानचे समर्थन केले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्याचं स्वागत केलं. त्यांनी तालिबानचे अफगाणिस्तानात पुनरागमन हे गुलामगिरीच्या बेड्या तोडल्याचं म्हटलं होतं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा