‘ऑपरेशन सिंदूर’ डॉक्युमेंटरीवरून रात्री २ वाजता पाकिस्तानच्या पोटात मुरडा

सोशल मीडियामधून डॉक्युमेंटरीवर टीका

‘ऑपरेशन सिंदूर’ डॉक्युमेंटरीवरून रात्री २ वाजता पाकिस्तानच्या पोटात मुरडा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित डिस्कव्हरीची दोन भागांची डॉक्युमेंटरी सध्या चर्चेत आहे. ‘Declassified: Operation Sindoor’ या माहितीपटाचा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्टला प्रीमियर झाला. ऑपरेशनच्या नियोजनापासून प्रत्यक्ष लष्करी कारवाईपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी यात मांडण्यात आल्या आहेत. मात्र या माहितीपटामुळे पाकिस्तानच्या पोटात मात्र मुरडा उठला. रात्री २ वाजता पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याने पोस्ट करत आपली पोटदुखी सांगितली.

पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी मंगळवारी मध्यरात्री सुमारे २ वाजता सोशल मीडिया पोस्टद्वारे डॉक्युमेंटरीवर टीका केली. हा माहितीपट ‘अतिनाट्यमय’ आणि भारताच्या बाजूने मांडलेला एकतर्फी कथानक असल्याचा आरोप त्यांनी केला. भारतीय नेतृत्वाच्या मुलाखतींमध्ये गांभीर्याचा अभाव असल्याचे सांगत शरीफ यांनी निवडक मुलाखती, भावनिक कथन आणि सिनेमॅटिक शैलीतील पुनर्रचनेद्वारे घटनांचे चित्रण करण्यात आल्याचा दावा केला. तसेच, माहितीपटातील कथनात मूलभूत विसंगती असून घटनांची देशांतर्गत स्वीकारार्ह आवृत्ती तयार करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले.

या डॉक्युमेंटरीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह भारतीय लष्कर आणि हवाई दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑपरेशनशी संबंधित अनुभव सांगितले आहेत. तत्कालीन लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, तत्कालीन डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई, हवाई ऑपरेशन्सचे तत्कालीन महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती आणि हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांचा यात समावेश आहे. ही डॉक्युमेंटरी डिस्कव्हरी आणि डिस्कव्हरी+ वर उपलब्ध आहे

हे ही वाचा:

संतापजनक! जुन्नरमध्ये १० वर्षांच्या चिमुकलीची अत्याचारानंतर हत्या

सायबर गुन्ह्यासाठी ४५०० सीम कार्ड; चीन पाकिस्तान कनेक्शन

उड्डाणाच्या वेळी वेग घटला, टेल स्ट्राइक, टायर फुटले… काय घडले म्युनिक विमानतळावर?

कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; नऊ बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ७ मे २०२५ रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या सहभागातून झालेल्या या ८८ तासांच्या मोहिमेतील नियोजन, निर्णयप्रक्रिया आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अनुभव या डॉक्युमेंटरीत मांडण्यात आले आहेत.

Exit mobile version